आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • NCP Senior Leader Madhukar Pichad Interest In Assembly Election

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्याचे आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांना विधानसभेतच इंटरेस्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- लोकसभेत संख्याबळ वाढावे यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातील ज्येष्ठ मंत्री आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले असले, तरी काही ज्येष्ठ मंत्री ही निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याची चर्चा आहे. आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचडही त्याला अपवाद नसल्याचे शनिवारी दिसून आले.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून पिचड यांच्या नावाची चर्चा असल्याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारले असता राष्ट्रवादीत तरुणांची मोठी फळी तयार झालेली आहे. त्यांनाच संधी देण्याची अपेक्षा पिचड यांनी व्यक्त करतानाच राजूर विधानसभा मतदारसंघातील लोक घरी बसू देणार नाहीत, असे म्हणत पिचड यांनी विधानसभेतच स्वारस्य असल्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहे.

दिंडोरी मतदारसंघात पिचड यांनी विविध कामांना भरघोस निधी दिला आहे. लोकसभेची ही मोर्चेमांधणी असल्याची चर्चा राजकीय पटलावर आहे. याबाबत पिचड यांना विचारले असता शरद पवारांनी जी जबाबदारी माझ्यावर टाकली ती प्रामाणिकपणे आपण पार पाडली आहे. विरोधी पक्षनेता, आदिवासी विभागाचे मंत्रिपद, प्रदेशाध्यक्षपद यासारख्या महत्त्वाच्या जबाबदार्‍या पार पाडल्या. आता या वयात निवडणूक लढवण्याची इच्छा राहिली नाही, मात्र, राजूरसारख्या आपल्या मतदारसंघात लोक घरीही बसू देणार नाहीत. पवारांना अपेक्षित असलेल्या संख्याबळाच्या पाठबळाचे काय, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला त्यावर पक्षात तरुणांची मोठी फळी तयार झाली असून त्यांना संधी मिळायला हवी, उपमुख्यमंत्री अजित पवार हे पाठबळ उभे करण्यास सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले.

तरूण चेहरा कोण?
तरूण चेहर्‍याना संधी द्यायला हवी असे मत व्यक्त करतानाच दिंडोरी लोकसभा मतदार संघातून लढण्यास इच्छूक नसल्याचे पिचड यांनी सांगितले असले तरी हा तरूण चेहरा दिंडोरीतून माजी आमदार रामदास चारोस्कर यांचा तर नाहीत ना? अशी चर्चा सुरू होती.

सगळीकडेच कामे करतो
दिंडोरच नाही तर जव्हार, मोखाडा, चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार अशा सर्वच जिल्ह्यात आदिवासी समाजबांधवांसाठी काम करतो आहे. सामाजिक बांधिलकी त्यामागे आहे. निवडणूक लढविणे हा उद्देश नसल्याचे पिचड यांनी स्पष्ट केले.