आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातब्बर नेत्यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रवादीचे मूक आंदोलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - देशातवाढत चाललेल्या अपप्रवृत्तींचा महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त ‘गांधीगिरी’ पद्धतीने निषेध करण्यासाठी सीबीएस येथील हुतात्मा स्मारकात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून शुक्रवारी (दि. ३०) एक तास मूक आंदोलन करण्यात आले.

दरम्यान, जिल्‍ह्याचे केंद्र असलेल्या नाशिकमधील आंदोलनाला ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ यांच्यापासून प्रमुख पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती अनेकांना खटकली. जिल्‍हा परिषद अध्यक्षा अन्य पदाधिकाऱ्यांनी मतदारसंघातील आंदोलनालाच हजेरी लावणे पसंत केले.

हुतात्मा स्मारक येथे सकाळी ११ वाजता हे आंदोलन सुरू झाले. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत सुरू असलेली धुसफूस त्यानंतर भुजबळ यांच्याकडे जिल्‍ह्यात राष्ट्रवादी वाढवण्यासाठी दिलेली विशेष जबाबदारी या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात आंदोलन सुरू झाल्यानंतर अनेकांची ये-जा सुरू होती. काहींनी हजेरी लावून पुढील कार्यक्रमांसाठी प्रयाण केले. भुजबळ हे मुंबईतील कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे या वेळी पदाधिकारी खासगीत सांगत होते. मात्र, समीर भुजबळ यांची अनुपस्थितीही लक्षात येत होती. दरम्यान, या आंदोलनात शहराध्यक्ष अर्जुन टिळे यांच्यासह माजी खासदार देवीदास पिंगळे, आमदार जयवंत जाधव, महिला शहराध्यक्षा सुनीता नमिसे, प्रदेश पदाधिकारी नाना महाले, दिलीप खैरे, प्रकाश नन्नावरे, गटनेत्या कविता कर्डक, सुनीता शिंदे, रूपाली गावंड, उषाताई अहिरे, विक्रांत मते, छाया ठाकरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.