आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओझरजवळ अपघातात तीन ठार, १५ जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओझर टाऊनशिप - मुंबई-आग्रा महामार्गावरील येथील बाणगंगा पुलाजवळ एसटी बस विंगर कारमध्ये झालेल्या अपघातात एका महिलेसह इतर दोघे ठार झाले असून, १५ जखमी झाले आहेत. सोमवारी पहाटे २.४५च्या सुमारास हा अपघात झाला.

नंदुरबार आगाराची बस (एमएच १४, बीटी २१३९) नाशिकहून नंदुरबारकडे जात होती. त्याच वेळी मालेगावहून नाशिककडे येणाऱ्या विंगर कारने (एमएच ०४, डीएन ३०५३) विरुद्ध बाजूने येऊन बसला धडक दिली. यामध्ये विंगरमधील सुमय्या शेख अमीर (रा. मालेगाव) या जागीच ठार झाल्या. अमीर महम्मद शेख सादिक, रिय्याजउद्दीन कमरोद्दीन (रा. मालेगाव) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गफार शेख, सागीर शेख, शकील फकीर मोहम्मद, परवीन खान, फरिदा बेग, बोरय्या मोहम्मद बिसमिल्ला, शोमिन बिसमिल्ला, नवशाद बिसमिल्ला, रियाज बिसमिल्ला, उमेदा शेख, वाहेद अजूम (सर्व रा. मालेगाव) तसेच बसमधील निंबा सूर्यवंशी (रा. पनवेल), हिराबाई जाधव, सुनंदा कुंवर, रूपाली शेवाळे हे जखमी झाले आहेत. पोलिस निरीक्षक प्रकाश मेढे, सहायक निरीक्षक आर. आर. बोठे, सहायक उपनिरीक्षक बी. डी. पवार, हवालदार एस. एन. केंग, आनंदा जाधव, भास्कर पवार, अभिमन्यू नाईक यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले.