आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नाशिक - राज्याला तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने सर्वत्र पाणी बचतीचे उपाय राबविले जात आहेत. अगदी होळीसारखे पारंपरिक सणही पाण्याचा अपव्यय न करता साजरे करून नागरिकांनी समाजभान राखले. मात्र, दुसरीकडे त्र्यंबकेश्वर नजीकच्या तळेगावस्थित एका रिसॉर्टमध्ये गुरुवारी पूल पार्टीच्या नावाखाली हजारो पाण्याची उधळपट्टी करण्यात आली. याबाबत खबर लागताच ‘दिव्य मराठी’ने घटनास्थळी धडक मारली असता, मद्यधुंद व अर्धनग्न अवस्थेत अनेक तरुण- तरुणींचा धांगडधिंगा सुरू असल्याचे दिसले. याची झलक सोबतच्या छायाचित्रांमध्ये पाहावयास मिळते.
आलिशान मोटारींमधून आलेल्या लब्धप्रतिष्ठित युवक-युवतींसोबत अल्पवयीन मुले-मुलीही या पार्टीत दंग झाली होती. यावरून काही दिवसांपूर्वी पुणे येथे घडलेल्या चिल्लर पार्टीच्या आठवणीही ताज्या झाल्या. आश्चर्याची बाब म्हणजे, या सगळ्या प्रकाराबाबत संबंधित यंत्रणा अनभिज्ञच होत्या. त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक किशोर मोरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्याविषयी आपणास माहिती नसून तशी परवानगीदेखील संबंधितांनी घेतली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘रुद्राक्ष’ कुणाच्या गळ्यातला?
पार्टीत तरुणींना एंट्री ‘फ्री’, तर तरुणांना प्रत्येक पाससाठी दीड हजार रुपये मोजावे लागले. ‘रुद्राक्ष’च्या नावाखाली हे पास दिले गेले. मात्र, त्यासंबंधीच्या इतर बाबी गुलदस्त्यातच राहिल्या.
पुढे पाहा तरूणाईची असंवेदनशीलतेची छायाचित्रे
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.