आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोळखी व्यक्तींपासून अधिक सतर्क राहणे गरजेचे, पोलिस-नागरिक संवाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- खून, छेडछाड चोरीच्या वाढत्या घटनांमुळे महिलांना घराबाहेर पडणे असुरक्षित वाटू लागले आहे. चोरट्यांकडून महिलांना "लक्ष्य' केले जात असल्याने महिलांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. महिलांनी बाजारात जाताना किंवा कोठेही अनोळखी व्यक्तींच्या संपर्कात जाऊ नये. जर काही अनुचित प्रकार होत असल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन इंदिरानगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सरदार पाटील यांनी महिलांना केले.
इंदिरानगर परिसरातील प्रभाग क्रमांक ४० मध्ये नगरसेविका डॉ. दीपाली कुलकर्णी यांच्या वतीने अजय मित्रमंडळाच्या सभागृहात पोलिस-नागरिक सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महिलांना सुरक्षा विषयावर मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते. या बैठकीत अजय मित्रमंडळाचे प्रमुख सचिन कुलकर्णी, सहायक पोलिस निरीक्षक राजेश गवळी, मनीषा कुलकर्णी, उमा राजूरकर आदी उपस्थित होते. पोलिस निरीक्षक पाटील यांनी महिलांना सुरक्षितता बाळगण्याचे तसेच, कुठल्याही अनुचित घटना घडल्यास तातडीने पाेलिस प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात परिसरातील महिलांनी रोडरोमिओंचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली. त्यावर परिसरात पोलिस गस्त वाढविण्यात येईल, असे आश्वासन पाटील यांनी या वेळी दिले. या वेळी स्नेहल काळे, शिल्पा देशपांडे, मंजूषा पुजारी, शैला विसपुते, सुजाता कुलकर्णी, मंजूषा जोशी आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
महिलांनी अशी घ्यावी खबरदारी...
- दागिने घालून सार्वजनिक ठिकाणी वावरू नये.
- रात्रीच्या वेळी महिलांनी एकटे घराबाहेर पडताना सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे.
- मोबाइलवर येणारे संदेश किंवा अनोळखी कॉलला प्रतिसाद देऊ नये.
- जागरूक राहून सावधानता बाळगली तर अनुचित घटना टळेल.
- अनुचित घटना घडल्यास पाेलिसांना कळवावे.
या महिलांचा सत्कार
नगरसेविकाडॉ. दीपाली कुलकर्णी यांनी सुरू केलेल्या प्रगती महिला मंडळाच्या ५०० सदस्यांना विविध उपक्रम राबवून सुरक्षितता, बचत, आरोग्य आदी महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. या कार्यक्रमादरम्यान जयश्री गोगटे मीना वाघ यांना कलाभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.