आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटनस्थळांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे, दत्ता टाक यांचे प्रतिपादन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पर्यटनस्थळांच्या विकासासाठी सर्व स्तरांवरून प्रयत्न होण्याची गरज आहे. पर्यटन क्षेत्रात येऊ पाहणार्‍या विद्यार्थ्यांनी पर्यटनाच्या वाढीसाठी पुढाकार घ्यायला हवा, तसेच त्याचा सर्व बाजुने अभ्यास करायला हवा, असे प्रतिपादन ट्रॅव्हल एजंट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता टाक यांनी केले.

एच. पी. टी. महाविद्यालयात पर्यटनदिनानिमित्त आयोजित ‘वर्ल्ड टुरिझम डे’ या कार्यशाळेचा रविवारी समारोप झाला. या प्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना टाक बोलत होते. ते पुढे म्हणाले की, नाशिकच्या पर्यटन विकासामध्ये ट्रॅव्हल एजन्सी आणि पर्यटन विभागाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. पर्यटन व्यवसाय करताना जास्तीत जास्त लोकांशी प्रत्यक्ष संवाद होणे आवश्यक असते. आपल्या ग्राहकांशी बोलल्यावर आपल्याला त्यांच्या गरजा आणि अपेक्षा समजतात. त्यानुसार त्यांना अपेक्षित सेवा तत्काळ पुरवणे हे ट्रॅव्हल एजंटचे कार्य असते. पर्यटन व्यवसाय क्षेत्रात चांगले संबंध प्रस्थापित कराल, तर व्यवसायात वृद्धी हमखास होते, असे सांगतानाच त्यांनी नाशिकच्या पर्यटन विकासासाठी कोणते बदल अपेक्षित आहेत किंवा कुठल्या गोष्टीत सुधारणा होणे अपेक्षित आहे, याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, उपप्राचार्य व्ही. डब्ल्यू. उगले, प्राध्यापक पठारे, नीलेश उगले यांसह पर्यटन अभ्यासक्रमाचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.