आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेहरू अभियानासाठी ५८ काेटींचा अतिरिक्त खर्च, देवांग जानी यांचे अायुक्तांना निवेदन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत केलेल्या कामांसाठी ठरलेल्या निधीपेक्षा महापालिका प्रशासनाने तब्बल ५८. ७५ काेटींचा अधिक खर्च केल्याची बाब गाेदावरी नागरी सेवा समितीचे अध्यक्ष देवांग जानी यांनी निदर्शनास अाणून दिली अाहे. या संदर्भात त्यांनी अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांना पत्र दिले असून प्रकरणाची चाैकशी करण्याची मागणी करण्यात अाली अाहे.
जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत शहरात विविध विकास कामेक रण्यात अाली. यामध्ये माेठ्या प्रमाणात विसंगती अनियमीतता दिसून येत असल्याचे जानी यांनी म्हटले अाहे.

मंजूर निधी झालेल्या पुर्णत्वाच्या कमांमधील फरक रक्कम ५८.७५ काेटी, युएलबी ३० टक्के अंतर्गत निधीपेक्षा अतिरिक्तचा निधी १२५.७४ काेटी, गाेदावरी नदीविकास अाणि साैंदर्यीकरणाच्या कामाव्यतिरिक्त वेगळीच कामे केली गेली, भुयारी गटार याेजनेच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत ८४ काेटींची कामे प्रलंबीत असल्याचे निदर्शनास अाणून देण्यात अाले अाहे.

याेजनेत नसलेल्या बाबींवर खर्च
^गाेवादरी विकास याेजनेत ज्या गाेष्टींचा समावेश हाेता ती कामे बाजूला ठेवून अन्य कामांवरच भर देण्यात अाला अाहे. त्यामुळे शासनाची फसवणूकच करण्यात अाल्याचे स्पष्ट झाले अाहे. याशिवाय यूएलबीअंतर्गत १२५.७४ काेटींची अतिरिक्त रक्कम खर्च करण्यात अाली अाहे. अायुक्तांनी या प्रकरणाची चाैकशी करण्याची ग्वाही अाम्हाला दिली अाहे. देवांगजानी, अध्यक्ष, गाेदाप्रेमी नागरी सेवा समिती

बातम्या आणखी आहेत...