आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनकल्याण रक्तपेढीतही आता ‘नॅट टेस्टेड’ रक्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक-नॅट टेस्टेड रक्ताची उपलब्धता आता नाशिकमधील जनकल्याण रक्तपेढीमध्येही करून देण्यात आली आहे. नॅट तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रतिकारकांऐवजी थेट रक्तातील संक्रमित जनुके (डीएनए व आरएनए) शोधून काढली जातात. त्यामुळे सुप्तावस्थेतील (‘विंडो पिरियड’) व्याधींची शक्यता अनेक पटींनी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे रक्त संक्रमणातून एच.आय.व्ही. आणि कावीळ यांसह अन्य विषाणूजन्य आजार होण्याचा धोका व्यावहारिक पातळीवर राहात नाही. विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान पूर्णपणे स्वयंचलित असल्याने त्यात त्रुटी टाळल्या जातात. या तंत्रज्ञानामुळे सुरक्षित रक्त मिळण्याची शाश्वती मिळते.

एखादा विषाणू रक्तदात्याच्या शरीरात सुप्तावस्थेत असेल तर त्या विषाणूंचा प्रतिकार करण्यासाठी शरीरात प्रतिकारके निर्माण होतात. या प्रतिकारकांचा शोध घेऊन या विषाणूंचे अस्तित्व ओळखण्याचे काम ‘एलायजा’ पद्धतीने केले जाते. मात्र, ही प्रतिकारके शरीरात तयार होण्यासाठी काही कालावधी (विंडो पिरियड) लागतो. या काळात तंत्राने विषाणूंचे अस्तित्व ओळखता येऊ शकत नाही. असे विषाणू न ओळखता आलेले रक्त अथवा रक्तघटक रुग्णाला दिले गेल्यास तो रुग्ण त्या-त्या संसर्गाने बाधीत होऊ शकतो. त्यामुळे एलायजापेक्षाही नॅट टेस्ट तंत्रज्ञान ‘विंडो पिरियड’ कमी करत असल्याने विषाणूंची बाधेची शक्यता अनेक पटींनी कमी करता येते. रक्त संक्रमणादरम्यान सुरक्षित रक्ताचे महत्त्व लक्षात घेऊन रुग्णांनी नॅट टेस्टेड रक्ताला प्राधान्य द्यावे, असे आवाहन रा. स्व. संघ जनकल्याण समिती संचलित जनकल्याण रक्तपेढीचे प्रशासकीय अधिकारी विनय शौचे यांनी केले आहे.

काय आहे नॅट टेस्ट रक्त
नॅट टेस्ट ही प्रगत देशांमध्ये बंधनकारक असणारी अन् जगातील सर्वात सुरक्षित रक्त तपासणी पद्धती आहे. नॅट म्हणजेच न्यूक्लरिक अँसिड टेस्ट नॅट टेस्टद्वारे कमी कालावधीत व अचूकतेने विषाणूसंसर्ग शोधला जातो. त्यामुळे रक्तघटकांची सुरक्षितता सर्वाधिक असते.

तपासणीचा तुलनात्मक अभ्यास
संसर्ग विंडो पिरियड विंडो पिरियड (तपासणीची पद्धत) (एलायजा) (नॅट)
एच.आय.व्ही- 25 दिवस- 5 दिवस
हिपॅटायटिस बी- 60 दिवस- 20 दिवस
हिपेटायटिस सी- 75 दिवस- 5 ते 7 दिवस