आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवा पिढीने उद्योजकतेकडे वळावे, बॉश कंपनीचे उपाध्यक्ष चिंतावार यांचे प्रतिपादन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कौशल्याधिष्ठित उच्च शिक्षण घेणाऱ्या युवा पिढीने आपले पहिले प्राधान्य उद्योजकतेला दिले पाहिजे. नवउद्योजकांसाठी केंद्र राज्य शासनातर्फे मेक इन इंडियाच्या माध्यमातून विविध सवलती प्रोत्साहनपर योजना आखल्या जात आहे. प्रगत राष्ट्राचे ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी उद्योजकतेकडे वळावे, असे आवाहन करतानाच कोणतेही काम करा, परंतु, त्यात तुम्ही सर्वोत्तम राहण्याचा प्रयत्न करा, यशाचे शिखर नक्की गाठता येईल, असे अावाहन बॉश कंपनीचे उपाध्यक्ष अविनाश चिंतावार यांनी केले.

संदीप फाउंडेशन संचलित अभियांत्रिकी आैषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांचा मंगळवारी पदवीप्रदान सोहळा पडला. या वेळी चिंतावार बोलत होते. या प्रसंगी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीपकुमार झा, प्राचार्य डॉ. संजय गंधे, मेंटॉर पी. आय. पाटील, व्यवस्थापिका मोहिनी पाटील, प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार तातेड, डॉ. अनिल जाधव, प्रशांत पाटील, संदीप पवार, डॉ. राकेश पाटील उपस्थित होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सूचनेनुसार महाविद्यालय स्तरावर हा पदवीप्रदान सोहळा झाला. यात मान्यवरांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

संदीप फाउंडेशन संचलित अभियांत्रिकी आैषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांत सावित्रीबाई फुले पुणे िवद्यापीठातर्फे पदवीप्रदान साेहळा पार पडला. याप्रसंगी उपस्थित पदवीधारक िवद्यार्थ्यांसह जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, बाॅशचे उपाध्यक्ष अिवनाश चिंतावार, फाउंडेशनचे अध्यक्ष डाॅ. संदीपकुमार झा, मेंटाॅर पी. अाय. पाटील, प्राचार्य एस. टी. गंधे अार. जी. तातेड अादी.

करिअरची हीच खरी सुरुवात...
उच्चशिक्षणाचा एक टप्पा यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर आता खरी करिअरला सुरुवात झाली अाहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांमध्ये उपजतच विविध गुण असतात. या गुणांच्या बळावर विद्यार्थ्यांनी देशाच्या प्रगतीत योगदान द्यायला हवे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनप्रसंगी केले.

६५०विद्यार्थ्यांना पदवीप्रदान
संस्थेच्यासंदीप इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड रिसर्च सेंटर, संदीप इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड मॅनेजमेंट संदीप इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस या महाविद्यालयांतील ६५० विद्यार्थ्यांना या वेळी पदवीप्रदान करण्यात आली. कार्यक्रमासाठी संयोजक प्रा. अनिल माहेश्वरी, प्रा. कैलास फालक, प्रा. स्वाती तळेले यांनी काम पाहिले.
बातम्या आणखी आहेत...