आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Appointment In Nashik Security Press On Sympathy Basis

फेब्रुवारी २०१३ पासूनच्या ४५ वारसांना प्रेसच्या नाेकरीची संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड - इंडिया सिक्युरिटी, करन्सी नाेट प्रेसमध्ये अनुकंपा तत्त्वावर सामावून घेण्यासाठीची वय शिक्षणाची अट शिथिल करण्यात अाल्याने दाेन्ही प्रेसमधील सुमारे ४५ मयत कामगारांच्या वारसांना नाेकरीची संधी मिळणार अाहे.
दाेन्ही प्रेसमध्ये सुरू असलेली मयत, अनफिट कामगारांच्या वारसांना सेवेत घेण्याची जुनी याेजना सन १९९५ पासून बंद हाेती.तत्पूर्वी पाच टक्केच्या नियमानुसार वारसांना सेवेत घेतले जात हाेते. सन १९९५ पासूनच्या वारसांनी प्रेसच्या सेवेत घ्यावे, यासाठी काही वर्षे अांदाेलने केली. याबाबत कामगार संघटनांकडून केवळ अाश्वासन देण्यात येत हाेते.
सन २००८ मध्ये दाेन्ही प्रेसचे महामंडळात रूपांतर झाल्याने १९९५ पर्यंतच्या हजार वारसांच्या नाेकरीची संधी गेली. महामंडळ झाल्यानंतर तब्बल सहा वर्षे एकाही वारसाला नाेकरी मिळाली नाही. मजदूर संघाने नाेकरी नाही तर किमान कामगारांच्या कुटुंबीयांना पैसे देण्याची याेजना महामंडळाकडून मंजूर केली. मजदूर संघात सत्तांतर झाले. ज्ञानेश्वर जुंद्रे, जगदीश गाेडसे यांच्या नेतृत्वाखालील कामगार पॅनलने महामंडळस्तरावर पाठपुरावा करून बंद पडलेली याेजना पुन्हा सुरू केली.
नाेकरी किंवा पैसे याचा निर्णय वारसांवर साेपवला. याेजनेला मंजुरी मिळाली, मात्र जानेवारी २०१३ पर्यंतच्या वारसांची नाेकरीची संधी हुकली. दहावी, बारावी उत्तीर्ण उमेदवारांना अायटीअायचे प्रमाणपत्र अावश्यक अाहे. नसल्यास पाच वर्षांच्या प्रशिक्षणात त्यांना ते मिळवावे लागेल.
पदवीधरांना थेट सेवेत घेतले जाईल. अायएसपी, सीएनपीचे महामंडळात रूपांतर झाल्यानंतर ज्या मयत कामगारांच्या कुटुंबीयांनी पैसे घेतले, त्यांना नाेकरीची संधी नाही. ज्यांनी घेतले नाही त्यांचे धनादेश व्यवस्थापनाकडे अाले अाहे. दि. फेब्रुवारी २०१३ पासूनच्या मयत कामगारांच्या कुटुंबीयांना नाेकरीची संधी असल्याचे मजदूर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी सांगितले.

मागील वर्षी अाठ जणांना मिळाली नाेकरी
याेजनेला फेब्रुवारी २०१३ पासून मंजुरी मिळाल्याने गेल्या वर्षी अायएसपी सीएनपीमधील कामगारांच्या वारसांना नाेकरी मिळाली. त्यापैकी दाेन पदवीधरांना लिपिक, तर सात जणांना कामगार म्हणून सेवेत घेतले. वय शिक्षणाची अट रद्दच्या निर्णयामुळे अायएसपीमधील २५, तर सीएनपीमधील २० अशा ४५ मयत कामगारांच्या वारसांना नाेकरीची संधी उपलब्ध झाली अाहे.