आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: नवीन बांधकामासाठी तीन महिन्यांत चार अर्ज, अडचणींच्या बाबींवर ताेडगा अपेक्षित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- गेल्या दाेन वर्षांपासून ठप्प असलेल्या बांधकाम क्षेत्राची काेंडी काही केल्या फुटण्याची चिन्हे नसून नवीन विकास अाराखडा शहर विकास नियंत्रण नियमावली मंजूर झाल्यानंतर तब्बल तीन महिने उलटल्यानंतर जेमतेम नवीन बांधकामासाठी जेमतेम चारच परवानगी अर्ज नगररचना विभागाकडे अाले अाहे. नऊ मीटरखालील टीडीअार बंदी, पार्किंगसाठी अतिरिक्त जागा साेडण्याच्या बाबी अडचणीच्या असल्याचे विकसकांचे म्हणणे असून, शासनाकडून कधी ताेडगा निघताे याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले अाहे. 
 
कपाट क्षेत्राच्या मुद्यावरून नाशिक शहरातील बांधकाम पूर्णत्वाच्या दाखल्यांना दाेन वर्षांपासून ब्रेक लागला अाहे. कपाटच नव्हे तर मध्यंतरी राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्बंधाने बांधकाम क्षेत्र प्रभावित झाले हाेते. या सर्वावर ताेडगा म्हणून २०३६ चा विचार करून तयार केलेल्या नवीन विकास नियंत्रण नियमावलीकडे बघितले जात हाेते. मात्र, महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत जाहीर झालेल्या नियमावलीत सर्वांची निराशा झाली.
 
या नियमावलीत नाशिककरांना दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्र्यांचे अाश्वासन फाेल ठरले. अाजघडीला शहरात बहुतांश इमारती नऊ मीटरखालील रस्त्यावर असून या रस्त्यासन्मुख बांधकामांना टीडीअार वा पेड एफएसअायचा पर्याय नसल्यामुळे बांधकाम व्यावसायिकच काय, परंतु पुनर्विकासाची अास बाळगणाऱ्या नाशिककरांची अडचण झाली अाहे. मध्यंतरी नियमावलीत सुधारणेसाठी क्रेडाई पालिकेकडून प्रयत्न हाेत असल्यामुळे विकसकांना अाशेचा किरण दिसत हाेता. या पार्श्वभूमीवरही बांधकाम परवानगींना ब्रेक लागल्याचे चित्र अाहे. 
 
पार्किंगमुळे काेंडी 
शहरात यापुढे नवीन इमारतीच्या अभिन्यासाला परवानगी देताना पार्किंगसाठी किती जागा साेडली याची तपासणी हाेणार अाहे. त्यानंतरच बांधकाम परवानगीसाठी नकाशे मंजूर हाेतील. एका सदनिकेसाठी एक कार, दोन मोटारसायकल दोन सायकलची जागा सोडणे बंधनकारक असून, वाहनतळासाठी इतकी जागा गेली तर छाेट्या अभिन्यास घर काेठे बांधायचे असा प्रश्न अाहे. दुसरीकडे नाशिकसाठी लागू नियमापेक्षा कमी जागा नागपूर पुण्यात साेडण्याचा नियम असल्यामुळे अापल्याच शहराविषयी सापत्नपणा का? असाही सवाल केला जात अाहे. 
बातम्या आणखी आहेत...