आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इ-गव्हर्नन्सद्वारे कामे आता उरकणार वेळेत, लोकाभिमुख, गतिमान प्रशासनाचे दिले वचन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- जनतेची कामे वेळेत करण्यासाठी इ-गव्हर्नन्सअंतर्गत लोकाभिमुख, गतिमान आणि मुख्य म्हणजे पारदर्शक पध्दतीने काम करण्यास प्राधान्य देणार आहे. कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याची वेळ येऊ देणार नाही, अशी ग्वाही नाशिकचे नवीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी मंगळवारी पहिल्याच दिवशी सूत्रे हाती घेताच नाशिककरांना दिले.
नाशिकच्या जिल्हाधिकारीपदाचा कारभार मुंबईतच स्वीकारत कुशवाह यांनी आपल्या कामास सुरुवात केली. त्यानंतर लगेचच जिल्हाधिकारी कार्यालयातील आपल्या दालनात प्रवेश करण्यापूर्वीच थेट त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थाच्या कामांसह साधू-महंतांसोबत आयोजित बैठकीस त्यांनी हजेरी लावली. ती संपताच नाशिकलाही सिंहस्थाच्या कामांच्या सखोल आढाव्याच्या बैठकीत हजर राहिले. असे पहिल्याच दिवशी मॅरेथॉन बैठकांनी स्वागत झालेल्या जिल्हाधिकारी कुशवाह यांनी इ-गव्हर्नन्स हेच माझे ध्येय असल्याचे सांगत मी संपूर्ण जिल्हा प्रशासन कागदमुक्त करणार असल्याचे सांगितले. सांगलीला अडीच वर्षांत िजल्हाधिकारी कार्यालय कागदमुक्त करत संगणकीकरण केले हाेते. त्यामुळे जनतेची कामे वेळेत हाेतील असे त्यांनी स्पष्ट केले.
सिंहस्थासाठीपुढील सात महिने काम करणार : सिंहस्थाहा जागतिक सोहळा आहे. त्यात आतापर्यंत झालेल्या बैठकीच्या आधारे बरेच काम झाले आहे. अजून खुप करावयाचे असल्याने मी पूर्ण ताकदीने काम करेल. ७० टक्के वेळ सिंहस्थालाच देणार आहे.
संकेतस्थळ आठ दिवसांत : सिंहस्थाचेसंकेतस्थळ आठ दिवसांत पूर्ण होईल, असे आजच्या सादरीकरणावरून दिसून आल्याचे कुशवाह यांनी सांगितले.

विमानतळपार्टीबाबत कल्पना नाही : विमानतळावरीलपार्टीची मला बातम्यातून माहिती मिळाली. त्याबाबत आताच बोलणे योग्य नाही. प्रकरण समजून घेतल्यानंतर मी बाेलेन.
रेशनसाठी बायोमेट्रिक...
रेशनदुकानांमध्येबायोमेट्रिक प्रणाली मी आणणारच. त्यामुळे धान्य कुठल्याही दुकानात कुठल्या ग्राहकाने घेतले याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना लागलीच ऑनलाइन समजणार. सांगलीत १०० दुकानेच झाली. येथे संपूर्ण जिल्ह्यात ही प्रणाली राबवित मी रेशनच्या काळाबाजारावर आळा घालणार.
कर्मचा-यांच्या पाठीशी उभा राहणार
इ-गव्हर्नन्सयाेजनेंतर्गत कामे वेगाने करण्यास माझे प्राधान्य राहणार आहे. त्यासाठी सर्वच कर्मचारी अधिकाऱ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. मी चांगल्या कामांसाठी त्यांच्या पाठीशी उभा राहील. ऑनलाइन सर्व कामे करणार असल्याने त्यांच्या पदोन्नतीपासून सेवा पुस्तकातील अडचणींसह सर्वच बाबींना प्राधान्य दिले जाईल.
दालनातील सीसीटीव्ही फुटेज इंटरनेटवर देणार
जिल्हाधिकारीही एक संस्थाच असून, जनतेला कशी अधिकाधिक चांगली सेवा देता येईल यावरच माझा भर आहे. विशेषत: पारदर्शकता हाच माझा अजेंडा आहे. त्यासाठी मी आता दालनात सीसीटीव्ही लावणार आहे. त्याचे फुटेजही मोफत इंटरनेटवर उपलब्ध केले जाईल. मी जेथेही गेलो तेथे प्रवेश करण्यापूर्वीच दालनात सीसीटीव्ही लावत असल्याचे सांगत त्यांनी नाशिकलाही त्वरित सीसीटीव्ही लावणार असल्याचे सांगितले.