आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवसंकल्पनांमधूनच वाढेल संशोधनात रुची - दीपेंद्रसिंह कुशवाह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - विद्यार्थ्यांनी नावीन्याचा ध्यास घेत नवनवीन कल्पना मांडून संशोधनात रुची वाढवली पाहिजे. पहिल्या प्रयत्नात अपयश आले, तरी खचून जाता सातत्यपूर्वक प्रयत्न केल्यास यशाचे शिखर नक्की गाठता येईल, असा सल्ला जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी विद्यार्थ्यांना दिला. के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात यांत्रिकी विभागातर्फे आयोजित "मेकहेवन-२०१६' या राष्ट्रीय स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, उपाध्यक्ष काशीनाथ टर्ले, प्राचार्य डाॅ. के. एस. नांदूरकर, सचिव प्रा. के. एस. बंदी, टेक्नोसेलचे कार्यकारी व्यवस्थापक अब्बास आबुजीवाला, विभागप्रमुख प्रा. एम. बी. मुरूगकर, प्रा. प्रवीण सुरवाडे आदी उपस्थित होते. कुशवाह पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी ज्ञानाची साधना करायला हवी. आपल्या ज्ञानाचा फायदा समाजासाठी केला पाहिजे. माजी राष्ट्रपती डाॅ. अब्दुल कलाम यांचा प्रेरणादायी आदर्श समोर ठेवून ग्रंथ हीच संपत्ती मानली पाहिजे.

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी १० वर्षांपासून या स्पर्धेच्या माध्यमातून कल्पकतेला चालना दिली जाते. या स्पर्धेत संपूर्ण देशभरातून विद्यार्थी नावीन्यपूर्ण प्रकल्प सादर करतात. या स्पर्धेत ट्रेजर हंट, बेंग बाॅरो स्टील, लेझर मेज, लेथवार, काॅट्राप्शन, पिक्सल एन, गुगल हंट, सेल्फी, बाइक मेनिया, क्वीझ, क्लिक इट, रोबो साॅकर, कॅड, रोबोरेस, एक्सटेम्पोर प्लॅश इट, गेमर अरिना, क्लॅश आॅफ कॅनन, पोस्टर प्रेझेंटेशन या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. अब्बास आबुजीवाला यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी आपल्यातील सुप्त गुणांना ओळखले पाहिजे. उद्योजक बनण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. विविध उपक्रमांत भाग घेऊन नवनवीन कल्पना मांडायला हव्यात. अभ्यासात सातत्य आणि कल्पकता कायम जोपासली पाहिजे, असा सल्ला अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी दिला.

प्राचार्य डाॅ. नांदूरकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम महाजन शर्वरी सोनार यांनी केले. तर प्रा. एम. बी. मुरूगकर यांनी आभार मानले. या वेळी गो-कार्ट आणि बाजा स्टुडंट यांनी तयार केलेल्या मोटारींचे मेकहेवेन ट्राॅफीचे अनावरण झाले. या स्पर्धेचे संयोजन प्रा. प्रवीण बी. सुरवाडे, विद्यार्थी संयोजक हर्शल गोेरे, ईश्वरी टेंभुर्णीकर, निखिल लभडे, संजय सिंग, नवीन चौधरी, नझीम शेख यांनी केले.
बातम्या आणखी आहेत...