आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Concepts Lean Cluster 'will Speed The Industry

नवी संकल्पना-लीन क्लस्टर’मुळे उद्योगांना मिळेल गती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक-शहरातील लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योगांसाठी ‘लीन क्लस्टर’ ही नवी संकल्पना पुढे आली असून, त्याला लवकरच मूर्त स्वरूप मिळणार आहे. दहा कंपन्यांचा यात सहभाग असून. यामुळे उत्पादन दर्जा, उत्पादकता तीस टक्क्यांपर्यंत वाढवण्यास मदत मिळेल. उद्योगांना कमीत कमी 20 टक्के उत्पादन यामुळे वाढविता येणे शक्य होणार आहे.
लीन क्लस्टरमध्ये 5 एस स्टॅँडर्ड ऑपरेशन प्रोसिजर, व्हॅल्यू स्ट्रीम मॅपिंग, झीरो डिफेक्ट, सिंगल मिनिट एक्स्चेंज ऑफ डायस, लेआउट चेंजेस या लीन साधनांचा वापर केला जातो. या अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी 60 हजार रुपयांचा खर्च त्यासाठी करावा लागणार आहे. उत्पादनाचा दर्जा उंचावण्याची इच्छा असलेल्या उद्योजकांना यामुळे दिलासा मिळणार असून, शहरातील औद्योगिक वसाहतींतील हा एकमेव उपक्रम असेल. निमाने पुढाकार घेतला असून सीमेन्सचे सहकार्य यासाठी मिळणार आहे.
36 लाखांचा निधी
प्रत्येक लीन क्लस्टरसाठी केंद्र सरकारच्या एमएसएमई (सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग) मंत्रालयाकडून 36 लाख रुपयांचा निधी तर देण्यात येतोच, शिवाय त्यासाठी प्रशिक्षकही मिळतात. क्लस्टरचा हेतू साध्य होतोय का, यावर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्याच अखत्यारीतील उत्पादन गुणवत्ता नियंत्रण विभागासारख्या विभागांकडून प्रशिक्षणावर लक्ष दिले जाते आणि 18 महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीत पाच ऑडिट होतात. किमान सहा आणि जास्तीत जास्त कितीही कंपन्यांना यात सहभागी होता येते.
असा असेल कार्यक्रम
प्रत्येक कंपनी दुसर्‍या फळीतील तीन-चार कामगारांना यात सहभागी करू शकते. प्रशिक्षणानंतर हेच कामगार कंपनीतील इतर कामगारांना प्रशिक्षित करू शकतील. अपघातरहित, गुणवत्ता आणि उत्पादकता यांच्यात कशी वाढ करायची, हा त्यांच्या प्रशिक्षणाचा मूळ हेतू असेल. प्रशिक्षणाच्या आठ महिन्यांनंतर अंतर्गत स्पर्धाही होते.
उद्योगांना होणार फायदा
टोयाटो या कंपनीने सर्वप्रथम ही पद्धत आणली. त्यांनाच याचे जनक म्हणावे लागेल. उद्योगांना या पद्धतीने प्रचंड फायदा होणार असून, सीमेन्स कंपनी या उपक्रमासाठी सहकार्य करणार आहे. मंगेश पाटणकर, सरचिटणीस, निमा