आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकच विद्यार्थी बनतात तेव्हा..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या एका वर्गातील चित्र.. सात ते आठ महिला रेल्वेगाडी खेळत-खेळत गाडी स्थानकात आणतात, तेथे रेल्वे पोलिस, तिकीट तपासणीस, स्टेशन मास्तर, प्रवासी, खाद्यपदार्थ विक्रेते, रिक्षाचालक वावरताना दिसतात.. तिकडे दुसर्‍या वर्गात पैशांची देवाणघेवाण सुरू असून, तेथे मुख्य प्रवेशद्वारावर रखवालदार, दोन महिला कॅशिअर असून, एक पैसे घेताना, तर दुसरी पैसे देतानाची स्थिती.. बाजूला व्यवस्थापक खुर्चीत बसलेले.. असे नाट्य सुरू असते. समोरील पंधरा ते वीस महिला आणि पुरुष या सर्व घडामोडी लक्ष देऊन टिपत असतात. प्रात्यक्षिके करणारे सर्व शिक्षक विद्यार्थ्यांप्रमाणे मार्गदर्शकांच्या आदेशाचे पालन करताना दिसत होते.
निमित्त होते इयत्ता तिसरी आणि चौथीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमासाठी बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक मार्गदर्शन शिबिराचे. तिसरी आणि चौथीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने ज्ञान मिळावे, प्रात्यक्षिकांवर भर, तसेच बाजारातील ज्ञानही अवगत व्हावे, यासाठी प्रत्यक्ष बँक, रेल्वेस्थानक, बसस्थानक, भाजीबाजार येथे त्यांना फिरवून तेथील घटकांची ओळख व्हावी, यासाठी महापालिका हद्दीतील इंग्रजी व मराठी माध्यमाच्या तिसरी, चौथीच्या शिक्षकांचे प्रशिक्षण शिबिर 7 ते 11 जून या कालावधीत पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे घेण्यात आले. त्यात 890 शिक्षकांनी सहभाग घेतला. त्यांना 64 तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. प्रशासनाधिकारी किरण कुवर, रार्जशी गांगुर्डे, चंद्रकांत गायकवाड, जयर्शी पंगुडवाले, लता सोनवणे, अनिल आंबेकर, दीपक पगार आदी उपस्थित होते.