आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मर्यादेइतकीही रक्कम मिळत नसल्याने ग्राहकांचा संताप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एका बाजूला केवळ काही बँकांची एटीएम सुरू असून, त्यातूनही केवळ दाेन हजारांचीच नाेट हाती पडत अाहे. तर, दुसरीकडे रिझर्व्ह बँकेने अाठवडाभराकरिताच्या ठरवून दिलेल्या मर्यादेइतकीही रक्कम मिळत नसल्याने ग्राहकांकडून अाता संतप्त भावना उमटायला लागल्याचे चित्र मंगळवारी काही बँकांच्या शाखांमध्ये पाहायला मिळाले. शहरातील नव्वद टक्के एटीएमही बंद असल्याने ग्राहकांना गेल्या दाेन दिवसांपासून मनस्ताप सहन करावा लागताे अाहे. दुसरीकडे चलनतुटवड्यामुळे पुन्हा एकदा मंदीचे चित्र दिसायला सुरुवात झाली अाहे. एकूणच बँकांनी अापापली एटीएम लवकरात लवकर सुरू करण्याची गरज अाहे.
शनिवार, रविवार अाणि साेमवार असे सलग तीन दिवस बँकांना सुटी हाेती, यामुळे अपेक्षेप्रमाणे मंगळवारी बँकांत माेठी गर्दी पाहायला मिळाली. सुट्यांच्या दिवसांत केवळ काही एटीएम सुरू असल्याने हजाराे ग्राहकांना एटीएममधूनही रक्कम मिळाली नव्हती, यामुळे संताप पाहायला मिळत हाेता. बँकांच्या शाखांतही काही प्रमाणात ताे पाहायला मिळाला. स्टेट बँकेच्या काही शाखांत केवळ दहा हजार रुपये, तर बँक अाॅफ महाराष्ट्रच्या शाखांत पाच ते दहा हजार रुपये तर अनेक बँकांच्या शाखांत पाच हजार रुपयेच ग्राहकांना विल्ड्राॅल मिळत हाेते. ग्राहकाची गरज पाहून त्याने केलेल्या विनंतीवरून विशिष्ट रक्कम मागणीनुसार दिली जात हाेती. करन्सी चेस्टमधून पुरेशी रक्कम मिळाल्याने बँकांच्या शाखांना अल्पसा चलनपुरवठा हाेत असल्याने ही स्थिती बँकांच्या शाखांवर अाेढावल्याचे सांगितले जाते.
स्टेट बँकेच्या मायकाे सर्कल शाखेत मंगळवारी महामार्ग प्राधिकरणाचे शाखा अभियंता बी. जी. चाैधरी यांना वेगळाच अनुभव अाला. गत अाठवड्याकरिताचे २४ हजार रुपये विल्ड्राॅल केल्यानंतर गरजेपाेटी या अाठवड्याचे २४ हजार रुपये विल्ड्राॅल करण्यासाठी ते गेले हाेते. मात्र, तासभर रांगेत उभे राहिल्यानंतर त्यांना १० हजार रुपयेच देण्यात अाले. त्यापेक्षा जास्त रक्कम देता येणार नाही, असे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. यावर चाैधरी यांनी थेट व्यवस्थापकांना याबाबत विचारणा केली असता अतिशय उर्मट भाषेत या व्यवस्थापकाने उत्तर दिल्याची तक्रार चाैधरी यांनी केली. ‘कुठे जायचे तिथे जा अन् माझी तक्रार करा’, अशी त्यांची भाषा हाेती. याबाबत अापण तक्रार करणारच असल्याचे चाैधरी यांनी सांगितले. मात्र, दिव्य मराठी’ने शाखा व्यवस्थापक जितेंद्र मेखे यांच्याकडे याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी अापल्या शाखेला अल्प रक्कम मिळाल्याने सर्वच ग्राहकांना पैसे मिळावेत, या उद्देशाने दहा हजार रुपये ग्राहकांना देत असल्याचे सांगितले. पैसे उपलब्ध असल्यावर देण्याचे कारणच नसल्याचे सांगून अरेरावीची भाषा अापण नाही तर ग्राहकानेच वापरल्याचे सांगितले.

बाजाराची पुन्हा मंदीकडे वाटचाल
बाजारात बहुतांश ग्राहक दाेन हजाराच्याच नाेटा घेऊन येतात, त्यांना परत द्यायला शंभर, पन्नासच्या नाेटाच नाहीत असे चित्र अाहे. दुसरीकडे डेबिट, क्रेडिट कार्ड स्वॅप करून खरेदी करायला पसंती मिळायला लागली हाेती. मात्र, बँकांकडून दाेन टक्क्यांपर्यंत करअाकारणी हाेत असल्याने ग्राहकांची पसंती या पर्यायालाही कमी हाेत अाहे, यामुळे व्यवहार चाळीस टक्के घटले असून, ही परिस्थिती लवकर बदलणे गरजेचे असल्याचे नाशिक घाऊक धान्य किराणा व्यापारी संघटनेचे पदाधिकारी राहुल डागा यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...