आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन वीज जोडणी आता सुलभ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - नवीन वीज कनेक्शनच्या दरात महावितरण कंपनीकडून सुधारणा करण्यात आली असून, नवीन दरपत्रक लागू केले आहे. नवीन दरपत्रक यापूर्वीच लागू केले असले तरी त्या दरात देखील सुधारणा करण्यात आली आहे. ज्या कनेक्शनसाठी उदाहरणार्थ 550 रुपये लागत होते, त्यात 50 रुपये कमी करून 500 रुपये करण्यात आले आहे.

कनेक्शनसाठी किती रक्कम भरावी लागते, त्यात सेवा जोडणी आकार, सुरक्षा ठेव, प्रक्रिया शुल्क याची माहिती ग्राहकांना नसल्याने काही अधिकारी, कर्मचार्‍यांकडून जास्ती पैसे उकळण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी कंपनीकडे आल्या. नवीन कनेक्शनसाठी अर्जाचा स्वीकार केला जात नाही, कर्मचार्‍यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळणे, कारण नसताना चकरा मारण्यास लावणे आदी तक्रारींमुळे नवीन कनेक्शनच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जोडणी मिळण्यात अडचणी येत असल्यास अशा ग्राहकांना तक्रार करण्यासाठी 18002-333435 / 18002-003435 हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील कुठलाही ग्राहक या क्रमांकावर आपली तक्रार नोंदवू शकणार आहे.

प्रत्येक कार्यालयात दरपत्रक
ग्राहकांच्या सोयीसाठी राज्यभरातील प्रत्येक कार्यालयात दरपत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे. नवीन कनेक्शन घेण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना किती पैसे भरायचे हे त्यामुळे समजणार असल्याने अधिकारी, कर्मचारी जास्त पैसे मागत असल्यास त्यांचे पितळ उघडे पडणार आहे. जोडणी देण्यास विलंब होत असल्यास ग्राहकाने तक्रार केल्यास त्याची तत्काळ दखल घेतली जाणार आहे. टोल फ्री क्रमांकावर याबाबत येणार्‍या तक्रारींचा दररोज संबंधितांना अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वरिष्ठ अधिकारी, मुख्यालय, महावितरण कंपनी