आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Era Crazy Girls Growing The Business Education

नवा जमाना-मुलींमध्ये व्यवसाय शिक्षणाची वाढती क्रेझ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक-मेडिकल, इंजिनिअरिंग, आयटी आदी अभ्यासक्रमांचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पालकांचा खर्च वाचवून कमी कालावधीत रोजगारप्राप्तीसाठी मुलांप्रमाणेच मुलीही व्यावसायिक प्रशिक्षण देणार्‍या अभ्यासक्रमाला प्राधान्य देत आहेत. नाशिक विभागात गत आठ वर्षांत या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींच्या संख्येत दुप्पट वाढ होऊन शासकीय ‘आयटीआय’मध्ये 2006 मध्ये असलेली दोन हजार 60 विद्यार्थिनींची संख्या 2013 मध्ये चार हजार झाली आहे.
अधिकाधिक मुलींनी व्यावसायिक शिक्षण घेता यावे, यासाठी शासनाने 2006 पासून तशा स्वरूपाचे अभ्यासक्रम निर्माण केले. तेव्हापासून शासकीय व खासगी ‘आयटीआय’मधील विद्यार्थिनींची संख्या वाढतच असल्याची स्थिती आहे. ‘आयटीआय’मध्ये संगणक, हेअर अँण्ड स्कीन केअर, ड्रेस मेकिंग, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिशियन, फीटर आदी प्रकारचे ‘ट्रेड’ मुलींसाठी उपलब्ध आहेत. त्यामध्ये संगणक व हेअर अँण्ड स्कीन केअर, ड्रेस मेकिंगच्या ‘ट्रेड’ला मोठा प्रतिसाद मिळताना दिसून येतो.
विभागात जळगाव व नाशिक येथे मुलींचे स्वतंत्र ‘आयटीआय’ आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक शासकीय ‘आयटीआय’मध्येही मुलींसाठी 30 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. विद्यार्थिनींची संख्या वाढत असल्याने ‘ट्रेड’ही वाढविण्यात येत आहेत. अनेक पालकही आपल्या मुलींना तंत्रशिक्षणासाठी प्रवृत्त करीत असल्याचे चित्र आहे.
त्वरित रोजगाराची संधी
डॉक्टर, इंजिनिअर होण्याची अनेक विद्यार्थिनींची इच्छा असते. मात्र, अनेकांची आर्थिक तशी परिस्थिती नसते. अशा मुलींसाठी ‘आयटीआय’चे ‘ट्रेड’ उपयुक्त ठरणारे असून, त्यामुळे त्वरित रोजगारप्राप्ती होण्यास मदत होते. बी. आर. शिंपले, सहायक संचालक, व्यवसाय शिक्षण
मुलींसाठी उपयुक्त
आयटीआय’मुळे केवळ नोकरीच नाही, तर स्वत:चा व्यवसायही सुरू करता येतो. त्यामुळे मुलींना सुरक्षित व त्वरित रोजगार मिळविण्यासाठी ‘आयटीआय’च्या ‘ट्रेड’चा उपयोग होत आहे. - सविता गायकवाड, प्रशिक्षणार्थी