आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जुन्या नाशकात होणार सांस्कृतिक भवन -

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अभियानात प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसह महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हजेरी लावली. सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यक्रमांसाठी शहरात सभागृह व नाट्यगृह असले, तरी प्रभागातील स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यासाठी सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार आहे. सभागृहामुळे नवोदित कलाकारांना नाटक सादर करण्यासाठी सराव करण्याची संधी मिळू शकेल. महापालिकेच्या माध्यमातून प्रभागात जागेचा शोध घेऊन ते लवकरच पूर्णत्वास नेले जाईल, असे आश्वासन शाहू खैरे व वत्सलाताई खैरे यांनी दिले.
वर्षभरात प्रभागात रस्ते, पथदीप, रस्ते, पाणी आदी सुविधा पुरविण्यात आल्या असून, पुढील कारकिर्दीत उर्वरित कामे लवकरच पूर्णत्वास नेण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. ‘विकास मंच’ या व्यासपीठाच्या माध्यमातून नागरिकांनी समस्या व प्रश्नांची विचारणा करीत आपली गाºहाणी मांडली. रस्ते, पाणी, दिवाबत्ती, आरोग्य या प्रमुख सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याने पुढील वर्षभरात नागरिकांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. जुन्या नाशकातील सोमवारपेठेतील सोनारवाडा सभागृहात ‘दिव्य मराठी’च्या वतीने रविवारी ‘विकास मंच’ अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रभाग क्रमांक 27 चे नगरसेवक शाहू खैरे, वत्सलाताई खैरे, ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक जयप्रकाश पवार, वृत्तसंपादक प्रताप जाधव, नीलेश खैरे आदी मान्यवर उपस्थित होते.
पूर्ण झालेली विकासकांमे व खर्च
० तीळभांडेश्वर मंदिर परिसरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण : 4 लाख 89 हजार रुपये
० प्रभागातील विविध ठिकाणी जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्यात आली : 4 लाख 99 हजार रुपये
० मिरजकर गल्लीमध्ये जलवाहिनीचे काम पूर्ण झाले :
3 लाख 34 हजार रुपये
० मधली होळी परिसरातील पाणीपुरवठ्याची विविध कामे पूर्ण झाली आहेत : 4 लाख 98 हजार रुपये
० दिल्ली दरवाजा ते दत्तकोट परिसरातील पाणीपुरवठा सुधारणा : 4 लाख 80 हजार
० संत नामदेव पथ ते गजराज चौकापर्यंत नवीन जलवाहिनीचे काम : 6 लाख रुपये
० देशपांडे गल्लीतील दीक्षितवाड्याच्या खुल्या जागेची संरक्षक भिंत : 11 लाख 25 हजार रुपये
० कानडे मारुती लेन ते अन्नपूर्णा मिलपर्यंत गटारीचे काम व काँक्रिटीकरण : 5 लाख 78 हजार रुपये
० शिरीषकुमार चौक ते छपरीची तालीमपर्यंत अंतर्गत गटारीची कामे व काँक्रिटीकरण : 25 लाख 26 हजार
० संभाजी चौक व्यायामशाळेस साहित्य : 33 हजार रुपये
० बडी दर्गा येथील शाळेजवळील रस्त्याचे काँक्रिटीकरण : 4 लाख 84 हजार रुपये
० पोलिस चौकी बडी दर्गा येथे लंगरखाना बांधणे :
13 लाख 56 हजार रुपये
० दत्त मंदिराशेजारी समाजमंदिर : 25 लाख 48 हजार
० रंगारवाडा शाळा इमारतीची दुरुस्ती करणे :
4 लाख 89 हजार रुपये
०प्रभागातील विविध ठिकाणी पथदीप बसविण्यात
आले : 7 लाख रुपये
नगरसेवक शाहू खैरे व वत्सलाताई खैरे यांनी प्रभागातील नागरिकांना दिला शब्द
> प्रभागातील बालाजी कोट परिसरात
स्वच्छता राखली जावी, यासाठी येथील कचराकुंडी बंद करण्यात येईल.
> शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या ग्राहकांसाठी तसेच महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.
> क्लस्टर डेव्हलपमेंट अंतर्गत गावठाणाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी पालिका व राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जाईल.
> बालाजी कोट परिसरात संरक्षक भिंत व जाळी बांधण्यासाठी प्रयत्न केले जातील.
> पूररेषेचा महत्त्वाचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल.
> पूररेषेतील नागरिकांना वाढीव एफएसआय देण्यासाठी प्रयत्न केले जातील.
> प्रभागातील प्रलंबित बांधकामांना परवानगी मिळवून देण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला जाईल.
> सराफ बाजार, तीळभांडेश्वर लेन या परिसरात पार्किंगचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपाय शोधले जातील.
> गाडगे महाराज धर्मशाळेजवळची भिंत वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील.
> पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून अमरधाम रस्त्यावरील अतिक्रमण काढले जाईल.
> जुन्या नाशकातील पडक्या वाड्यांच्या आवारात तत्काळ विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल.
विकास आराखड्यात हवे वाढीव चटईक्षेत्र (एफएसआय)
शहराचा नवीन विकास आराखडा तयार करताना गावठाण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी रहिवाशांना वाढीव चटईक्षेत्र देण्याची गरज आहे. गोदावरी पूररेषेतील रहिवाशांना बांधकामांची परवानगी तातडीने मिळाली पाहिजे. क्लस्टर डेव्हलपमेंट अंतर्गत गावठाणचा विकास आराखडा तयार करण्याची गरज आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या या भागात वाहनतळांचा अभाव असल्याने मोठी समस्या निर्माण होते. अरुंद रस्त्यांमुळे या भागात वाढीव चटईक्षेत्र देऊन विकास होण्याची गरज आहे. क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी महापालिका प्रशासन व राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन नगरसेवक शाहू खैरे यांनी दिले.
प्रभागातील नागरिकांनी ‘विकास मंच’ अभियानात सुचविले महत्त्वाचे उपाय
बालाजी कोट परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. लोकमान्य शाळा परिसरातील कचराकुंडीमुळे समस्येत भर पडतेय. - प्रमिला मोरे
सिंहस्थाच्या नियोजनात स्थानिक नागरिकांच्या अडचणी समजावून घ्याव्यात. नियोजनात स्थानिकांचा समावेश करण्यात यावा.
- सुरेश देवरे
परिसरात 10 ते 15 वर्षांपूर्वीच्या गंजलेल्या जलवाहिन्या असल्याने पाण्याची गळती तर होतेच, पण डेÑनेजचे पाणी मिसळून आरोग्याचा प्रश्न उद्भवतोय. - सदानंद जोशी
अनधिकृत बांधकामे...
अनेक बेकायदेशीर बांधकामांमुळे दुर्घटना घडू शकते. या प्रकरणी कारवाई व्हावी.
- प्रशांत दौंडकर
गोदावरी स्वच्छता करावी
कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी तातडीने उपाययोजना करण्यात यावी. - सुधीर पैठणकर
कचराकुंडीची समस्या
उर्दू शाळेजवळ कचराकुंडीची व्यवस्था करावी. घंटागाडी नियमित येण्यासाठी लक्ष द्यावे.
- फरीद खान
अतिक्रमण काढावे
जुन्या नाशकातील अमरधामरोड ते शितळादेवी मंदिर परिसरातील अतिक्रमण काढावे.
- गोविंद विधाते