आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच दोनशे बेडचे रुग्णालय शहरामध्ये उभारणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात जिल्हा रुग्णालयासह एकूणच आरोग्य यंत्रणेवर पडणारा संभाव्य अतिरिक्त ताण लक्षात घेता खास सिंहस्थासाठी 200 खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार असून, इमारतीचे कामही बांधकाम विभागाने सुरूकेले आहे.

वर्षभरावर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीची प्रशासकीय स्तरावरील कामे अपेक्षेप्रमाणे झाली नसल्याने सरकारी यंत्रणेत धडकी भरली असून, कामे पूर्ण करण्यासाठी यंत्रणेची धावपळ सुरू झाली आहे. त्याचाच परिपाक म्हणजे सचिवांनी दर आठवड्याला बैठक घेण्याचे आदेश दिले असून, मंगळवारी यासंदर्भात झालेल्या बैठकीत 200 खाटांच्या रुग्णालय इमारतीचे काम आठ दिवसांत सुरू करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहे.

खास सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी उभारण्यात येण-या या रुग्णालयाच्या दोन इमारती जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच बांधण्यात येणार असून, जिल्हा रुग्णालयाला ते जोडलेले असेल. तसेच, त्र्यंबकेश्वर येथील 75 खाटांचे रुग्णालय डिसेंबरअखेर पूर्ण होणार असल्याचे महेश पाटील यांनी सांगितले.

निधीची अडचण नाही
मार्च 2015 पर्यंत बांधकाम विभागाकडून रुग्णालयाच्या या इमारतीचे काम पूर्ण होऊन ही इमारत आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करणार आहे. ती त्यांनी करावी. जेणेकरून रुग्णालयातील खाटांचे नियोजन तसेच अतिदक्षता विभागासह सर्वच बाबींची त्यात उपलब्धता करता येईल. निधीची अडचण नाही.
डॉ. बी. डी. पवार, आरोग्य उपसंचालक
रुग्णालय कर्मचारी भरतीप्रक्रिया राज्यस्तरावर
या ठिकाणी केवळ रुग्णालयाची इमारत प्रस्तावित करण्यात आली आहे. मात्र, सरासरी 28 नर्स आणि 12 वैद्यकीय अधिका-यांची या रुग्णालयासाठी आवश्यकता भासणार असून, ही सर्व पदे राज्यस्तरावरून त्याच वेळी भरण्यात येणार असून, शिपाई आणि वर्ग चारची सर्व पदे कंत्राटी स्वरूपावर भरली जाणार आहेत.