आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Industry Not Need 25 Permission Insisted Of 76 Industry Minister Desai

नव्या उद्याेगांसाठी ७६ ऐवजी केवळ २५ परवाने - उद्योगमंत्री सुभाष देसाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राज्यात नवा उद्याेग सुरू करण्यासाठी उद्याेजकाला घ्यावे लागणारे विविध परवाने, अनुदानांचा लाभ वेगाने मिळण्यासाठी ‘ई-सॉफ्ट डुइंग बिझनेस प्रणाली’ येणार आहे. यामुळे आता नव्या उद्याेगासाठी ७६ ऐवजी २५ परवानेच लागतील, असे उद्याेगमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी सांगितले.

शुक्रवारी देसाईंनी नाशकात उद्याेजक संघटनांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न जाणून घेतले. उद्याेग उभारणीसाठी सध्या ७६ प्रकारचे परवाने लागतात. त्यासाठी उद्योजकांचा वेळ व पैसाही खर्च होतो. तो टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काम सुरू केले आहे. यासंदर्भात मंत्र्यांच्या बैठका होत आहेत. त्यानुसार ७६ ऐवजी २५ परवाने आणि ते देण्यासाठीही शासकीय विभागांना कालमर्यादा ठरवून दिली जाईल. उद्याेग सुरू करताना एकादाच फायर एनओसी घ्यावी लागेल.