आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Land Develop For Industry In Nashik Said Industrial Minister Subhash Desai

नाशकात ८२ एकरवर उभारणार अाैद्याेगिक प्रदर्शनासाठी केंद्र उद्याेगमंत्री देसाई यांची घाेषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अाैद्याेगिक प्रदर्शन भरविण्यासाठी उद्याेजकांना हक्काची जागा उपलब्ध व्हावी म्हणून नाशकात कायमस्वरूपी अाैद्याेगिक प्रदर्शन केंद्र साकारण्यात येणार असल्याची घाेषणा राज्याचे उद्याेगमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी येथे केली. ठक्कर इस्टेट येथे ‘निमा इंडेक्स प्रदर्शन २०१५’ च्या उद‌्घाटनाप्रसंगी ते बाेलत हाेते.
या वेळी व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष रवी वर्मा, प्रदर्शन कमिटी अध्यक्ष एच. बी. थाँटेश, निमाचे उपाध्यक्ष संजीव नारंग, जिंदाल साॅ प्रा. लि.चे दिनेशचंद्र शहा, एचएचएलचे जनरल मॅनेजर अार. नारायण, निमाचे माजी अध्यक्ष मनीष काेठारी उपस्थित हाेते. देसाई पुढे म्हणाले की, नाशिकमध्ये अाैद्याेगिक प्रदर्शन केंद्र व्हावे, अशी उद्याेजकांची मागणी हाेती. यावर राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेतला असून, लवकरच या प्रदर्शन केंद्राच्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हाेणार अाहे. यासंदर्भात नगररचना सचिव नाशिक महापालिकेचे अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांच्याशी चर्चा करण्यात अाली असून, लवकरच ८२ एकर जागा निश्चित करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल.
या केंद्रामुळे उद्याेगक्षेत्राला चालना मिळून महाराष्ट्राचा अाैद्याेगिक क्षेत्रातील प्रगतीचा अालेख अधिक उंचवण्यासाठी नाशिकचे चांगले याेगदान मिळू शकणार अाहे. महाराष्ट्र सरकारने ‘मेक इन महाराष्ट्रा’चा नारा दिला अाहे. त्याअंतर्गत राज्य सरकारने लघु मध्यम उद्याेगांसाठी स्वतंत्र धाेरण निश्चित केले अाहे. जर्मनीत पार पडलेल्या हॅनाेव्हर प्रदर्शनात महाराष्ट्राने जगाचे लक्ष अापल्याकडे वेधून वेगळी छाप पाडली.
जर्मन उद्याेजक महाराष्ट्रात येण्यास इच्छुक असून, तरुण उद्याेजकांबराेबर मध्यम लघु उद्याेग सुरू करण्याची त्यांची तयारी अाहे. या संधीचे तरुण उद्याेजकांनी स्वागत केले पाहिजे. स्थानिक उद्याेजकांनी या नवीन संधीचा फायदा घ्यावा. अागामी काळात कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे उद्याेग अाणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही ते म्हणाले. प्रास्ताविक एच. बी. थाँटेश यांनी, सूत्रसंचालन हर्षद ब्राह्मणकर यांनी, तर अाभार प्रदर्शन निमाचे जनरल सेक्रेटरी मंगेश पाटणकर यांनी केले.

सरकारने ताब्यात घेतलेल्या एक हजार भूखंडांचे वाटप

अाैद्याेगिक वसाहतीमधील भूखंड विकले गेले. परंतु, ते वापराविना पडून हाेते, असे भूखंड सरकारने पुन्हा ताब्यात घेतले अाहेत. यासाठी राज्यात चार हजार भूखंडधारकांना नाेटिसा बजावण्यात अाल्या हाेत्या. त्यातील हजार ७५ भूखंड ताब्यात घेण्यात अाले असून, त्यात नाशिकमधील १०७ भूखंडांचा समावेश अाहे. या भूखंडांचे नव्याने वाटप करण्यात येणार अाहे. ज्यांना अद्याप भूखंड मिळाले नव्हते त्यांची नाराजी यातून दूर हाेईल. मात्र, भूखंड घेतल्यानंतर प्रत्यक्ष उत्पादन कधी सुरू हाेणार याचे प्रतिज्ञापत्र भूखंड घेणाऱ्या उद्याेजकाला द्यावे लागणार असल्याचेही देसाई यांनी स्पष्ट केले.

रिव्हर रेग्युलेशन अॅक्ट रद्द

यूपीए सरकारने रिव्हर रेग्युलेशन अॅक्ट लागू केला हाेता. यामुळे नदीपात्रापासून २२ मीटरच्या परिसरात कंपनी अथवा उद्याेग सुरू करण्यासाठी परवानगी मिळत नव्हती. त्यामुळे गुंतवणूक करूनही उद्याेग सुरू करता येत नव्हते. या अॅक्टबाबत अाम्ही केंद्र सरकारकडे विचारणा केली असता हा अॅक्ट केवळ महाराष्ट्रातच असल्याचे समाेर अाले. जास्तीत जास्त नियम काढून केवळ पैसे खाण्याचे काम यूपीए सरकारने केले. मात्र, अाैद्याेगिक क्षेत्राला चालना देण्याचे अामचे धाेरण असल्याने अाम्ही हा अॅक्ट रद्द केला असे देसाई यांनी स्पष्ट केले.

जाचकना हरकत प्रमाणपत्रापासून मुक्तता

उद्याेजकांनी भूखंड घेतल्यानंतर त्यावर प्रकल्प सुरू करण्यासाठी ७६ प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागत हाेत्या. या प्रक्रियेत अधिक सुलभता अाणि पारदर्शकात यावी म्हणून अाता केवळ २५ परवानग्या घेणे बंधनकारक करण्यात अाल्याचे देसाई यांनी सांगितले.