आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Machinery In Reference Service Regional Hospital

‘संदर्भ’ रुग्णालयात येणार आणखी दहा डायलिसिस यंत्रे, अत्याधुनिक यंत्रणा खरेदीसाठी शासनाची मंजुरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात आता अाणखी दहा डायलिसिस यंत्रे डायलिसिस चेअर उपलब्ध करून देण्यात येणार अाहेत. या यंत्रांची खरेदी केली जाणार असून, येत्या पंधरा दिवसांत सीटी स्कॅन यंत्रणेसह इतर यंत्रणेचीही दुरुस्ती केली जाणार आहे. या रुग्णालयासाठी लागणाऱ्या अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या खरेदीस शासनाने मंजुरी दिली आहे.
दर्जेदार रुग्णसेवा मिळण्यासाठी आरोग्य विभागाने संदर्भ सेवा रुग्णालय सुरू केले असून, हजारो गरजूंनी त्याचा लाभ घेतला आहे. तसेच, गेल्या काही दिवसांपासून विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात अत्यधुनिक यंत्रणेच्या अभावामुळे गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावा लागत अाहे. तसेच, संदर्भ सेवा रुग्णालयात संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येत असल्यामुळे रुग्णालयातील डायलिसिस विभागात असलेले मशिन कमी पडत आहेत. या मशिनमधील दोन एचआयव्ही एचबीएसएसी रुग्णांसाठी राखीव आहे. तर, डायलिसिस प्रतीक्षा यादी दर दिवशी २० ते २५ अशी अाहे. यामुळे संदर्भ सेवा रुग्णालयात दोन शिफ्टमध्ये रुग्णांचे डायलिसिस केले जात आहे. दिवसेंदिवस डायलिसिस करणाऱ्या रुग्णांचे वाढते प्रमाण बघता रुग्णालयात आणखी दहा डायलिसिस यंत्र डायलिसिस चेअरची गरज होती. या डायलिसिस यंत्र डायलिसिस चेअर तत्काळ उपलब्ध करून देण्यासाठी आमदार देवयानी फरांदे यांनी अर्थमंत्र्यांकडे वारंवार पाठपुरावा केला असल्याने संदर्भ सेवा रुग्णालयात डायलिसिस विभागात आता डायलिसिस यंत्र चेअरसाठी मंजुरी मिळाली असून, या यंत्रणा लवकरच दाखल होणार आहे. ‘संदर्भ सेवा’तील महागडी सीटी स्कॅन यंत्रणाही बंद पडल्यामुळे रुग्णांना पदरमाेड करीत खासगी रुग्णालयांतच सीटी स्कॅन करावे लागत आहे. ‘संदर्भ’मधील सीटी स्कॅन यंत्रणेतही बिघाड झाल्याने अाता रुग्णांना माेठ्या प्रमाणावर गैरसाेयीला सामाेरे जावे लागत अाहे. यामुळे येत्या पंधरा दिवसांत संदर्भ रुग्णालयातील सीटी स्कॅनचीही दुरुस्ती केली जाणार असून, रुग्णांची गैरसोय टळणार आहे.

सर्व यंत्रणा होणार सुरू..
^संदर्भ सेवा रुग्णालयातील बंद यंत्रणेबाबत अर्थ आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा करून यंत्रणा सुरू करण्यास मंजुरी मिळवली आहे. येत्या पंधरा दिवसांत सीटी स्कॅन सुरू होणार असून, दहा डायलिसिस यंत्र डायलिसिस चेअरची खरेदी केली जाईल. - प्रा. देवयानी फरांदे, आमदार

‘संदर्भ'मध्ये लवकरच किडनीरोपण शस्त्रक्रिया
खासगी रुग्णालयात तीन ते पाच लाख रुपयांचा खर्च होणाऱ्या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची सुविधा विभागीय संदर्भ रुग्णालयात गरजूंसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. किडनी प्रत्यारोपण करण्यासाठी खासगी रुग्णालयात लाखाच्या घरात खर्च येत असल्याने साधारण स्थितीतील अनेक रुग्ण उपचार अर्धवट सोडत होते. त्यासाठी आमदार देवयानी फरांदे यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून पाठपुरावा सुरू होता. आता या प्रकल्पालाही मंजुरी मिळाली असून, किडनीरोपणदेखील लवकरच ‘संदर्भ’मध्ये सुरू होणार असल्याची माहिती आमदार देवयानी फरांदे यांनी दिली.