आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकास - शहरात साकारणार 23 पालिका बाजार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी गंजमाळ, महात्मा फुले भाजी मार्केट, यशवंत मंडई, तिबेटियन मार्केटसह 23 जागा बीओटी तत्त्वावर विकसित करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. महापालिकेने नाममात्र दरात भाडेतत्त्वावर दिलेल्या कोट्यवधींच्या मालमत्तांसाठी चालू बाजारभावाप्रमाणे भाडे आकारण्याचे आदेशही सभापती उद्धव निमसे यांनी दिले.
अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी ही विशेष बैठक झाली. सदस्यांनी सूचना करीत व हरकती घेत सुधारणा सुचविल्या. महापालिकेला 80 टक्के उत्पन जकातीच्या माध्यमातून मिळते. यामुळे घरपट्टी, पाणीपट्टीसह अन्य स्रोतांद्वारे उत्पन्न कसे वाढविता येईल, याविषयी आढावा घेण्यात आला. 23 जागांवर बहुमजली पालिका बाजार विकसित करण्यासाठी नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले. सामाजिक-सेवाभावी संस्थांना भाडेतत्त्वावर दिलेल्या जागांचा वापर व्यावसायिक कारणांसाठी होत असल्याचा मुद्दा उपस्थित करीत जागाधारकांकडून चालू बाजारभावाप्रमाणे भाडे आकारण्याची सूचना बांधकाम, मिळकत आणि विविध कर विभागास करण्यात आली. यातून वाचनालय, ग्रंथालय, अभ्यासिकांना वगळण्यात यावे, असे सभापती म्हणाले. मेट्रो ट्रेनसाठी करणार सव्र्हे : मेट्रो ट्रेन प्रकल्पासाठी जागा आरक्षित केल्या जाणार आहेत. सव्र्हेसाठी एक कोटींच्या निधीची तरतूद धरण्यात आली आहे.
व्यावसायिक करात होणार वाढ - उपआयुक्त आर. एम. बहिरम यांनी घरपट्टी आणि पाणीपट्टी करात दहा टक्के वाढीच्या सादर केलेल्या प्रस्तावास अजय बोरस्ते, बाळासाहेब सानप, अशोक मुर्तडक, दामोदर मानकर, विक्रांत मते आदींनी विरोध करीत कर वाढविण्याऐवजी अधिकार्‍यांनी पाण्याची गळती रोखावी, असा सल्ला दिला. त्याचबरोबर, अनेक मालमत्ताधारकांकडून कर वसूल केला जात नाही. त्यांचा शोध घेतल्यास महसुलात वाढ होऊ शकते, अशी सूचनाही त्यांनी केली. रहिवासी क्षेत्रातील करांमध्ये वाढ करण्याऐवजी व्यावसायिक मालमत्ताधारकांसाठी पाणीपट्टी व घरपट्टीत 25 टक्के दरवाढ सुचविण्यात आली.
उत्पन्नवाढीसाठी पर्याय

कमानींचे जाहिरात दर वाढविणार
गाळ्यांच्या भाड्यात वाढ
कर भरण्याचा पर्याय शोधणार
पार्किंगच्या जागा निश्चित करणार
बाजार शुल्काचे दर वाढविणार
टॉवर उभारलेल्या कंपन्यांवर दंडात्मक कारवाई
विविध उपकरांमध्ये वाढ करणार