आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Mumbai Pattern Use Nashik Mahapalika For Cleen India

स्वच्छतेसाठी अाता ‘नवी मुंबई पॅटर्न’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिकशहर स्वच्छ सुंदर करण्यासाठी अाता अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी नवी मुंबई महापालिकेने राबविलेल्या याेजना यंत्रसामग्रीचा अभ्यास करण्याचे अादेश अाराेग्याधिकाऱ्यांनादिले अाहेत. त्यामुळे अाता नवी मुंबई महापालिकेच्या अभ्यास दाैऱ्यावर पालिकेचे अधिकारी लवकरच जाणार अाहेत.
नाशिक महापालिका क्षेत्रात डेंग्यूने धुमाकूळ घातल्यानंतर अाराेग्य यंत्रणेच्या ढिसाळ कामगिरीवर टीकेची झाेड उठली. महापाैर, नगरसेवकांबराेबर सामाजिक संस्थांना स्वच्छता माेहीम हाती घ्यावी लागली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या काळात सफाई कर्मचाऱ्यांचाही बेशिस्तपणा चव्हाट्यावर अाला. महापाैरांपासून तर अायुक्तांपर्यंतच्या दाैऱ्यात दांडीबहाद्दर सफाई कर्मचारी अाढळून अाले. अायुक्तांनी कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर यंत्रणेचा कारभार सुधारला. मात्र, यंत्रसामग्रीचा तुटवडा ही प्रमुख समस्या असल्यामुळे अाता यांत्रिक पद्धतीने सफाईचा प्रयत्न प्रशासनाने सुरू केला अाहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात यांत्रिक झाडूपासून तर सफाईसाठी महत्त्वाची उपकरणे वापरली जातात. तसेच, या महापालिकेने राबवलेले काही प्रयाेगही यशस्वी ठरले अाहेत. नाशिकपासूनच जवळच असल्यामुळे या महापालिकेचा अभ्यास दाैरा करण्याचे अादेशदिल्याचे अायुक्तांनी सांगितले.
यंत्रसामुग्रीचा अभ्यास
नवीमुंबई महापालिकेने सफाईसाठी यांत्रिक झाडूचा वापर केला असल्याने पालिकेचे अधिकारी या यंत्रसामुग्रीचाही अभ्यास करतील.
घंटागाड्यांवर राहणार वचक
महापािलकाक्षेत्रात अनियमित येणाऱ्या घंटागाडीबाबत नागरिकांबरोबरच नगरसेवकांच्याही मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. घंटागाडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जीपीएस यंत्रणा कार्यान्वित केली जाईल. त्याचे मॅिपंग करण्यासाठी आरोग्यविभागामध्ये ऑनलाइन यंत्रणा बसविली जाईल, असेही आयुक्त गेडाम यांनी सांिगतले.
सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना ‘अच्छे दिन’
दिवंगतसफाई कर्मचारी तसेच सेवानिवृत्त झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत अनुकंपा तत्त्वावर सामावून घेण्यासाठी तातडीने कारवाई करा, असे अादेश अायुक्तांनीदिले. लाड समितीच्या शिफारशीनुसार अायुक्तांनी बैठक घेऊन दाेन्ही वर्गवारीत बसवणाऱ्या वारसांची संख्या निश्चित करण्याचे अाराेग्य विभागाला सांगितले.