आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • New Number Plate In Next Six Month In Maharashtra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सहा महिन्यांत वाहनांच्या नंबरप्लेट बदलणार, सुरक्षिततेचा उपाय थेट नंबरप्लेटवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सुरक्षिततेच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देशात सर्वत्र वाहनांच्या एकसारख्याच नंबरप्लेट बसवण्यात येणार असून, राज्यात सहा महिन्यांमध्ये टप्प्याटप्याने हाय सिक्युरिटी नंबरप्लेट लावण्यात येणार आहेत. राज्य शासन परिवहन आयुक्त कार्यालयामार्फत उत्पादकांसाठी निविदा मागवित 300 ते 500 रुपये किमतीपर्यंत या प्लेट उपलब्ध करून देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

केंद्रीय मोटार वाहन अधिनियम 1989 च्या नियम 50 अन्वये राज्यात दुचाकी, कार, ट्रक, ट्रॅक्टरसह सर्वच प्रकारच्या वाहनांच्या क्रमांकाच्या पाट्या बदलण्यात येणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून दहशतवादी कृत्यांमध्ये चोरी केलेल्या वाहनांचा मोठय़ा प्रमाणात उपयोग केल्याचे लक्षात आले आहे. तसेच वाहनांच्या चोर्‍या, तस्करीसारख्या प्रकारात वाहनांच्या नंबरप्लेट बदलून ही वाहने सर्रास गुन्ह्यात वापरली जात आहेत. त्याचबरोबर, वाहन क्रमांकांच्या पाट्या बदलून त्याचे सुटे भाग चोरण्याच्या व परराज्यात वाहनांची विक्री केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी व सुरक्षिततेसाठी एचएसएनपी (हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स)ची सक्ती करण्यात येणार आहे. मुंबईसह राज्यातील मोठय़ा शहरांपाठोपाठ इतर उपपरिवहन कार्यालयांमार्फत त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

अशी असेल नंबरप्लेट

हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवर क्रोमियम होलोग्राम हेच वैशिष्ट्य असून, स्क्रूच्या मदतीने नंबरप्लेटवर स्नॅपलॉक बसवले जाणार आहे. ही प्लेट 1.0 मिलिमीटरची व अँल्युमिनिअमची राहणार असून प्लेटच्या कडा आणि कोपरे वतरुळाकार, उठावदार कडा असतील. या पाटीवर रिफ्लेक्टिव शीट किमान पाच ते सात वर्षे कायम राहतील. प्लेटवर मध्यभागी अगदी डावीकडे निळ्या रंगाने ‘आयएनडी’ अशी अक्षरे असतील. होलोग्रामव्यतिरिक्त स्टिकर्स अथवा चिकट लेबल लावता येणार नाही. प्लेटवर वाहनक्रमांकाच्या बाजूला किमान सात अंकांचा कायमस्वरूपी लागोपाठचा ओळख क्रमांक असेल. जो परावर्तकावर लेसर ब्रँडेड असेल व हॉट स्टँपिंग फिल्मवर पडताळणी कोरलेली असेल.