नाशिक; प्रायोगिक स्तरावरील संकल्पनांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सातत्यपूर्ण संशोधन केले पाहिजे. संशोधनासाठी सर्व स्रोतांचा वापर करून नावीन्यपूर्ण निर्मिती करणे शक्य आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रमापुरते संशोधन करता नवनिर्मिती करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहिले पाहिजे. मेक इन इंडियासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे वळले पाहिजे, असे आवाहन प्राचार्य डॉ. गजानन खराटे यांनी येथे केले.
संदीप फाउंडेशन संचलित संदीप इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि रिसर्च सेंटर महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन्स शाखेअंतर्गत संशोधन पद्धतीने ‘इनोव्हेशन’ या विषयावर पाचदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. खराटे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी प्राचार्य डॉ. एस. टी. गंधे, डॉ. आर. जी. तातेड, डॉ. ए. जी. जाधव, विभागप्रमुख प्रा. जी. एम. फडे, डॉ. राकेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेसाठी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप कुमार झा, जनरल मॅनेजर प्रा. मोहिनी पाटील, मेंटॉर प्रा. पी. आय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यशाळेसाठी प्रा. प्रवीण धुळेकर, प्रा. गणेश अत्तरदे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. संशोधनाच्या पद्धतींविषयी या कार्यशाळेत तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
‘इनोव्हेशन’ विषयावरील कार्यशाळेप्रसंगी संदीप इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि रिसर्च सेंटरचे प्राचार्य डॉ. खराटे यांच्यासह शिक्षक.