आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाली पंचाईत - रस्त्याचे रुंदीकरण झाले जणू वाहतुकीच्या गैरसोयीसाठीच!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत सुमारे 62 किलोमीटर रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. त्यातील 31 किलोमीटरचे काम अर्धवट झाले आहे. महापालिका प्रशासन, पदाधिकारी व मक्तेदार कंपनी यांनी नियोजन न केल्याने चुकीच्या पद्धतीने कामे झाली आहेत. रुंदीकरण झाले, रस्ते दुपदरी झाले पण वाहतुकीसाठी रस्ते गैरसोयीचेच ठरू लागले आहेत.
18 महिन्यांची मुदतही संपत आली

दुपदरी असलेले रस्ते अद्ययावत पद्धतीने करण्यात येत आहेत. 14 फेब्रुवारी 2013 रोजी कामाची वर्कऑर्डर दिली. 18 महिने कामाची मुदत देण्यात आली. ती 14 ऑगस्ट 2014 रोजी संपत आहे. या 18 महिन्यांच्या कालावधीत 62 किमी रस्त्यापैकी 31.25 किमी 12 रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली, तेही अपूर्ण अवस्थेत आहेत.

मनपा प्रशासनाचा हलगर्जीपणा
झालेल्या करारानुसार महापालिकेने मक्तेदारास रस्त्यावरील अतिक्रमण काढून देणे, विद्युत खांब काढणे, नवीन बसविणे, ड्रेनेज लाइन टाकणे ही कामे अगोदर करून देणे आवश्यक होते. पण ते झाले नाही. तरीही रस्त्याचे काम सुरू झाले. त्यामुळे आता सुरू असलेल्या 12 रस्त्यांपैकी एकही रस्ता पूर्ण झाला नाही. सुनील नगर ते प्रिसीजन फॅक्टरीपर्यंतच्या 0.57 किमी रस्ता सर्वाधिक 82 टक्के तर सर्वात कमी सात रस्ता ते रूपाभवानी पर्यंतचा 3.89 किमी रस्ता 20 टक्के पूर्ण करण्यात आला आहे.

पुढे काय?
रस्त्याची मुदत 14 ऑगस्ट रोजी संपत असून, त्यानंतर रस्त्याचे झालेल्या कामाचा आढावा घेऊन पुढील निर्णय मनपा आयुक्त घेतील. त्यापूर्वी नगर अभियंता कार्यालयाकडून प्रभारी आयुक्ताकडे याबाबत मार्गदर्शन मागवण्यात आले. 14 ऑगस्ट नंतर पुढील दिशा स्पष्ट होईल.

आमच्याकडून आहेत काही अडचणी
- मक्त्याची मुदत 14 ऑगस्टपर्यंत आहे. आता रस्ते अपूर्ण असले तरी तोपर्यंत त्याबद्दल काही सांगता येणार नाही. आमच्याकडूनही काही अडचणी आहेत. त्यानंतर पाहणी करून बोलता येईल. काही रस्त्यावर कामे चालू आहेत.’’ संदीप कारंजे, उपअभियंता, महापालिका

या रस्त्यांची कामे व टक्केवारी (कंसात किमी)
सात रस्ता ते रूपाभवानी मंदिर (3.89) : 30
सैफुल ते मजरेवाडी गेट (3.58) : 80
एमआयडीसी - सुनील नगर (1.37) : 80
सुनिलनगर - कुंभारी रोड (0.57) : 82
तुकाराम चौक - कुंभारी नाका (3.88) : 70
मार्कंडेय तलाव - सैनिक नगर (0.91) : 80
इंचगेरी मठ ते राजस्व नगर (5.13) : 80
अक्कलकोट रस्ता एमआयडीसी -
कुंभारी रस्ता एमआयडीसी (1.88) : 75
जुना कुमठा नाका - स्वागत
नगर (1.97) : 70
महालक्ष्मी मंदिर - राठी कारखाना
(1.63) : 65
मजरेवाडी बस स्टॉप - सुमिक्षा जनरल स्टोअर्स (2.17) : 40
महिला हॉस्पिटल - अंत्रोळीकर नगर (1.55) : 70
कुंभारवेस - जोडभावी पोलिस चौकी
(0.55) : 85