आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाळीव जनावरे रस्त्यावर अाल्यास मालकाविराेधात फाैजदारी गुन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या तसेच पादचाऱ्यांसाठी उपद्रवी ठरणाऱ्या माेकाट जनावरांना पकडण्यासाठी महापालिकेने ठेका दिला असून, काेणाचे चुकून जनावर रस्त्यावर माेकाट फिरल्यास पहिल्यांदा दंडात्मक कारवाई त्यानंतर पुन्हा रस्त्यावर जनावर अाले तर थेट मालकावर फाैजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला अाहे. त्यामुळे भविष्यात पाळीव जनावरांवरून मालक विरुद्ध ठेकेदार असे खटके उडण्याची भीती अाहे.
महापालिका क्षेत्रात माेकाट जनावरांना पकडून काेंडवाड्यात टाकले जाते. प्रामुख्याने जी जनावरे शहरातील वाहतुकीला अडथळे ठरतात वा नागरिकांवर हल्ले करण्याची भीती असते त्यांच्यावर अंकुश प्रस्थापित करण्याचा त्यामागचा उद्देश अाहे. दरम्यान, माेकाट जनावरे पकडून काेंडवाड्यात अाणण्याचा ठेका पालिकेकडून दिला जाताे. मागील काही महिने ठेकेदारच मिळत नसल्यामुळे काेंडवाड्यात जनावरे नेणार काेण, असा प्रश्न हाेता. मध्यंतरी एका ठेकेदाराने काम करण्याची तयारी दाखवल्यावर पालिकेने माेकाट जनावरे पकडण्याचे कंत्राट संबंधिताला दिले. अाता नवीन ठेकेदाराने जाेमाने काम सुरू केले असून, राेज रस्त्यावर येणाऱ्या माेकाट जनावरांना पकडण्याचे काम केले जात अाहे. यात अाता पालिकेने प्रथम जनावर पकडल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला अाहे. यावेळी जनावराला एक टॅग लावला जाणार असून, जेणेकरून तेच जनावर पुन्हा पुन्हा रस्त्यावर येते का, याची खातरजमा केली जाणार अाहे. तसे झाल्यास भविष्यात थेट मालकाविराेधात फाैजदारी कारवाई केली जाणार असल्याचे उपअायुक्त राेहिदास बहिरम यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, रस्त्यावर भटकणारे माेठे जनावर पकडल्यास ७८२ रुपये पकडण्याचा खर्च, १९८ रुपये खानपान एक हजार रुपये प्रशासकीय खर्च असे एका दिवसासाठी दोन हजार रुपये घेतले जातात. त्यानंतर पुढील दिवस खाणावळ खर्च साेडवेपर्यंत लागू केला जाताे. मध्यम जनावर पकडल्यास ५०५ रुपये पकडण्याचा खर्च, ५०० रुपये प्रशासकीय खर्च, तर १७८ रुपये खाणावळ खर्च असा दंड अाहे. लहान जनावरासाठी ३०० रुपये प्रशासकीय खर्च, ३९६ रुपये पकडण्याचा तर ६९ रुपये खाणावळीचा खर्च अाहे.

४०९ जनावरे कोंडवाड्यात
एप्रिल महिन्यापासून जनावरे पकडण्याचा ठेका सुरू झाला असून, अातापर्यंत ४०९ जनावरे पकडून कोंंडवाड्यात टाकली अाहेत. त्यापैकी ३१२ जनावरे दंड भरून साेडवण्यात अाली अाहेत. दरम्यान, ठेकेदाराकडून प्रामुख्याने शहरातील प्रमुख मार्ग, चाैकातील माेकाट जनावरे पकडणे अपेक्षित असताना गल्लीबाेळात, माेकळ्या मैदानावरून चुकून रस्त्यावर येणाऱ्या पाळीव जनावरांवर दबा धरून पकडण्याच्या तक्रारी वाढू लागल्या अाहेत. अातापर्यंत दंडात्मक कारवाईपुरते ठीक हाेते, मात्र थेट मालकाविराेधात गुन्हा दाखल करण्याचे अादेश असल्यामुळे येत्या काळात संघर्ष वाढण्याची भीती अाहे.
बातम्या आणखी आहेत...