आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाचारसंहितेतही लाल दिव्याच्या गाडीत मंत्री रावल यांचे ‘पर्यटन’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची अाचारसंहिता नाशिक विभागात सुरू झालेली असल्याने या काळात कुठल्याही सार्वजनिक िकंवा खासगी कार्यक्रमासाठी मंत्र्यांना लाल दिव्याच्या गाडीतून फिरता येत नाही. मात्र, शुक्रवारी राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल हे लाल दिवा लावलेल्या वाहनातून एका खासगी कार्यक्रमासाठी शहरात अाले हाेते. अाचारसंिहतेत मंत्र्यांना केवळ कार्यालयीन कामाच्या प्रवासाकरिताच लाल दिवा असलेल्या वाहनांचा वापर करता येताे. मात्र, नाशिकच्या इंद्रप्रस्थ हाॅल येथे एका एक्स्पाेच्या उद‌्घाटनाकरिता रावल शुक्रवारी दुपारी पांढऱ्या रंगाच्या इनाेव्हा (एमएच १८ एपी २८४७) या वाहनाने दाखल झाले, त्यावर लाल दिवा सुरू हाेता. कार्यक्रम अाटाेपल्यानंतर मंत्रिमहाेदय कार्यक्रमस्थळावरून रवाना झाले तेव्हाही वाहनावर लाल दिवा कायमच हाेता.
 
राज्य मंत्रिमंडळातील एका जबाबदार मंत्र्याकडून झालेल्या अाचारसंहिता भंगाच्या या घटनेबाबत अाता निवडणूक अायाेग काय पाऊल उचलते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार अाहे.   

माहिती िमळाल्यावर लाल दिवा काढला   
मी अाजारी असतानाही केवळ नाशिककरांच्या प्रेमापाेटी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलाे. मुंबईहून थेट कार्यक्रमस्थळी पाेहाेचलाे, त्यामुळे वाहनाला लाल दिवा कायम राहिला. मात्र, अाचारसंहिता सुरू असल्याचे लक्षात अाल्यानंतर तातडीने दिवा हटवण्यात अाला.   
- जयकुमार रावल, पर्यटनमंत्री

शासकीय कामाकरिता वापर करण्याची मुभा  
निवडणूक अाचारसंहितेच्या काळातही निवासस्थानापासून कार्यालयापर्यंत अाणि शासकीय कामांसाठी मंत्र्यांना लाल दिव्याच्या वाहनाचा वापर करण्याची मुभा देण्यात अालेली अाहे.
- राधाकृष्णन बी., िजल्हाधिकारी,  नाशिक
 
पुढिल स्लाइडवर वाचा फडणवीस, गडकरी व्हीव्हीआयपी ‘प्रेक्षक’!  
बातम्या आणखी आहेत...