आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Secondary School,latest News In Divya Marathi

पानांतून जागर पर्यावरणाचा, शाळेच्या निसर्ग फलकावर झळकले संदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सानेगुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सय्यद पिंप्री येथील नूतन माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम राबवत असून, प्रामुख्याने पर्यावरणाचा जागर करत आहेत. दसऱ्यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आपट्याची पाने वाटण्याऐवजी विद्यार्थी कागदापासून स्वत:च्या हाताने बनविलेली आपट्याच्या पानाच्या आकारातील शुभेच्छापत्र वाटणार आहेत. विशेष म्हणजे त्यातून विविध संदेश देत ते पर्यावरणाबरोबरच मूल्य संस्कृतीचाही प्रसार करणार आहेत.
शाळेत सध्या नववीचे विद्यार्थी ‘फुलपाखरू वाचवा’ तर दहावीचे विद्यार्थी ‘झाडांची पाने वाचवा’ उपक्रम राबवत आहेत. पर्यावरणाची हानी होता आपले सण, उत्सव सांस्कृतिक ठेवा जपून आनंद द्विगुणित करण्यासाठी विद्यार्थी हे उपक्रम राबवत आहेत. निसर्ग वाचवा, पाणी, हवा ध्वनिप्रदूषण टाळा, परिसर स्वच्छ ठेवा तसेच मूल्यशिक्षणावर आधारित विचार या उपक्रमांद्वारे परिसरात पोहचविण्यात येत आहेत. िशक्षणाधिकारी नवनाथ औताडे यांच्या प्रोत्साहनातून ‘हरित कुंभ’चा हा उपक्रम शाळेत राबविण्यात येत आहे. गेल्या वर्षी शाळेने प्रदूषणमुक्त आनंददायी दिवाळी साजरी करण्यासाठी विद्यार्थ्यांना सामूहिक शपथ दिली होती. तसेच दिवाळीचे गोड पदार्थ संग्रहित करून गरीब मुलांना त्याचे वाटप करण्यात आले होते. तसाच उपक्रम यंदाही राबविण्यात येणार आहे. प्राचार्य बी. ए. गोसावी, पर्यवेक्षिका के. डी. आव्हाड, विज्ञान मंडलाचे ए. एस. गुंजाळ, नितीन मुठाळ, हरित सेनेचे नवजीत जोशी, प्रतिभा मोकळ, बी. बी. गवळी, एन. एम. आहिरे, कलाशिक्षक योगेश रोकडे आदी उपक्रमासाठी प्रयत्नशील आहेत. स-यानिमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आपट्याच्या पानांच्या प्रतिकृतींवरील संदेश निसर्ग फलकावर लावण्यात आले होते. हे संदेश पाहताना विद्यार्थी शिक्षक वर्ग. या संदेशांद्वारे विद्यार्थ्यांनी पर्यावरणाविषयी प्रबोधनाचा उपक्रम हाती घेतलाय.