आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्र सरकारतर्फे सार्वजनिक खासगी सहभागिता योजनेद्वारे आयआयटीमध्ये नवीन अभ्यासक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कुशल मनुष्यबळ निर्मितीच्या उद्देशाने केंद्र शासनातर्फे पंचवार्षिक योजनेद्वारे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपद्वारे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी विशेष योजना राबविण्यात आली आहे. या योजनेंतर्गत नाशिकमधील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था या मुलींच्या आयटीआयमध्ये चार नवीन अभ्यासक्रम तयार केले आहेत. विशेष म्हणजे, या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत एक हजार मुलींना तंत्र शिक्षणातील कौशल्य मिळाले आहे. या योजनेतील आदर्श ठरलेल्या या संस्थेने मुलींना कौशल्याधिष्ठित करतानाच उद्योजक होण्याची प्रेरणाही दिली.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा दर्जा सुधारावा आणि कुशल मनुष्यबळ तयार व्हावे, या उद्देशाने ११ व्या पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून केंद्र शासनाने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपद्वारे देशभरातील १३९६ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा दर्जा वाढविण्यासाठी आर्थिक तरतूद केली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक संस्थेला अडीच कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले आहेत. त्यानुसार, या योजनेंतर्गत मुलींच्या आयटीआय संस्थेने सुविधांयुक्त स्वतंत्र इमारत उभारण्यात आली असून, चार नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. लॅब प्रात्यक्षिकांसाठी साहित्यही उपलब्ध केले आहेत.
विभागातील ४० संस्थांचा समावेश
इलेक्ट्रॉनिक्समॅकेनिक, इन्फर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टिम मॅनेजमेंट, इंटेरिअर डेकोरेशन अँड डिझाइन, कॉम्प्युटर ऑपरेटर या अभ्यासक्रमांचे एक हजार मुलींना धडे मिळाले. योजनेच्या अंमलबजावणीसाठी आयएमसी ट्रस्ट स्थापला असून त्यास रिलायन्स इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीचे सहकार्य आहे. ट्रस्टचे चेअरमन संतोष मंडलेचा तर सचिव प्राचार्य एस. एल. परदेशी आहेत. योजनेत विभागातील ४० आयटीआय संस्थांचा समावेश आहे.
प्रशिक्षणामुळे फायदा
अभ्यासक्रमपूर्ण केल्यानंतर मोठ्या कंपन्यांमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करण्याची संधी मिळत असल्याने त्याचा फायदा होत आहे. तसेच, रोजगाराबरोबरच स्वत:चा उद्योगही सुरू करण्याची संधी आहे.
प्राजक्ता गामणे, विद्यार्थिनी
कौशल्य विकासाला चालना
औद्योगिकक्षेत्रात मल्टी स्किल मनुष्यबळाला मागणी वाढली असल्याने हा बदलता ट्रेण्ड लक्षात घेऊन नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. शासनाच्या आर्थिक मदतीमुळे कौशल्य विकासाला चालना मिळाली आहे.
एस.एल. परदेशी, प्राचार्य, आयटीआय संस्था
बातम्या आणखी आहेत...