आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मुकणे'ला वादाचे नवीन वळण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भविष्यातील नाशिक शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल २७० काेटी रुपये खर्चून उभारल्या जाणाऱ्या ‘मुकणे’ पाणीपुरवठा याेजनेतील ठेकेदार निश्चितीच्या वादाने नवीन वळण घेतले अाहे. या कामासाठी पात्र ठरलेल्या लार्सन अॅण्ड टुर्बाे या कंपनीने नगर जिल्ह्यातील बऱ्हाननगर पाणीपुरवठा याेजनेचे काम अर्धवट साेडल्यामुळे बेशिस्त कार्यपद्धती असलेल्या ठेकेदाराला काम द्यायचे का, असा सवाल माजी विराेधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांनी केला अाहे. यासंदर्भात महापालिका अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनाही पत्र पाठवले अाहे.

बडगुजर यांनी अायुक्तांना पाठविलेल्या पत्रात म्हटले अाहे की, लार्सन अॅण्ड टुर्बाे कंपनीकडे नगर जिल्ह्यातील बऱ्हाननगर इतर ४४ गावांच्या पाणीपुरवठा याेजनेचे ४५ काेटी ७२ लाख रुपयांचे काम दिले हाेते. काम पूर्ण करण्यासाठी अाॅगस्ट १९९९ ते अाॅगस्ट २००२ इतकी मुदत देण्यात अाली हाेती. प्रत्यक्षात नानाविध कारणामुळे ३१ मार्च २००९ उजाडले तरी, या याेजनेचे काम पूर्ण झाले नाही. एप्रिल २००९ मध्ये कंपनीने या याेजनेचे काम पूर्ण करण्यास अापली असमर्थता व्यक्त केल्यानंतर अहमदनगर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने कलम अंतर्गत (क) कंपनीस नाेटीस बजावून रिस्क अॅण्ड काॅस्ट करीत दुसऱ्या मक्तेदाराकडून काम करून घेतले अाहे. तसेच, लार्सन अॅण्ड टुर्बाेची अनामत रक्कम ८२ लाख ४५ हजार रुपये जप्त करण्याची कारवाई केली.

या पार्श्वभूमीवर अशा बेजबाबदार ठेकेदाराकडून काम करून घेणे उचित नाही त्यामुळे महापालिकेच्या संभाव्य नुकसानीची जबाबदारी प्रशासन घेणार काय, असा सवाल बडगुजर यांनी पत्रकारांशी बाेलताना केला.

मुकणे धरण याेजनेचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या काेर्टात...
मुकणेधरण याेजनेतील पाणीपुरवठ्याच्या कामाला नगरविकास राज्यमंत्र्यांनी १८ मे २०१५ राेजी स्थगिती दिली अाहे. सद्यस्थितीत या कामासंदर्भात नगरविकास मंत्र्यांकडेच सुनावणीही सुरू अाहे. दरम्यान, यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्थगिती उठवण्याची मागणी केल्याचे समजते. दुसरीकडे महापालिका अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनीही पत्र पाठवून स्थगिती उठल्यास केंद्र शासनाचा निधी परत गेल्यास जबाबदारी काेण घेणार, असाही सवाल केल्याचे समजते.