आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन शाहीमार्गाच्या वापराचे दिले संकेत, असा आहे पर्यायी शाहीमार्ग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आगामी कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा अंदाज पाहता जुन्या शाहीमार्गाची सध्याची स्थिती अधिक धोकादायक ठरू शकते. या पार्श्वभूमीवर नवीन शाहीमार्गाचा अवलंब करण्याचे संकेत अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांनी रविवारी दिले. नवीन शाहीमार्गाबाबत आखाडा परिषद आणि प्रशासनात वाद सुरू होता.
शाहीमार्गास महंतांनी तत्त्वत: मान्यता दिल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
महंत ग्यानदास महाराजांनी सिंहस्थ प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत साधुग्रामच्या कामांसह नवीन शाहीमार्गाची रविवारी (दि. ४) पाहणी केली. कुंभमेळा कामांचा आढावा घेऊन तपोवनात सुरू असलेल्या साधुग्रामच्या कामांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. ‘मेरी’च्या जागेचीही या वेळी पाहणी केली. गुरुवारी (दि. ८) संभाव्य कामे आणि निधीसंदर्भात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. दरम्यान, साधुग्राम परिसरातील शेतकऱ्यांनी मात्र या दौऱ्याकडे पाठ फिरविली. मागील दौऱ्यात शेतकऱ्यांनी जागा देण्यास विरोध दर्शविला होता. या वेळी नवीन शाहीमार्गाचा अवलंब करण्याचे संकेत महंतांनी दिल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. जिल्हाधिकारी विलास पाटील, महापौर अशोक मुर्तडक, आमदार बाळासाहेब सानप, महेश पाटील, पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, सहायक आयुक्त पंकज डहाणे, शहर अभियंता सुनील खुने यांच्यासह महापालिका जिल्हा प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

गुरुवारीशिक्कमोर्तब शक्य : गुरुवारी(दि. ८) महंत, पालकमंत्री प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत या मार्गास अधिकृत मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

सुरक्षेसाठी नवीन शाहीमार्गाचा पर्याय
-जुनाशाहीमार्ग पुरेसा सुरक्षित नाही. होणाऱ्या गर्दीच्या तुलनेत नवीन शाहीमार्ग सुरक्षित वाटतो. साधुग्रामच्या कामासंदर्भात समाधानी असून, निधी आणि कामांसंदर्भात पालकमंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. महंतग्यानदास महाराज, अध्यक्ष,अखिल भारतीय आखाडा परिषद
कुंभमेळ्यासारखा महोत्सव पार पडण्यासाठी मोठ्या निधीची तरतूद हवी, आपले सरकार याबाबत काय करणार, असा सवाल महंत ग्यानदास महाराज यांनी आमदार बाळासाहेब सानप यांना विचारताच जिल्हाधिकारी विलास पाटील पालिका आयुक्त गेडाम यांनीही मान खाली घातली.

‘त्या’ शाहीमार्गाचा वापर नाहीच : बारावर्षांपूर्वी प्रशासनाने दुर्घटना टाळण्यासाठी तपोवन गंगाघाट आणि पंचवटी स्मशानभूमी, गंगाघाटमार्गे गौरी पटांगण असा त्यावेळी नवीन शाहीमार्ग निर्माण केला होता. शाहीमार्गात स्मशानाचे दर्शन होत असल्याने साधू- महंतांचा या मार्गास विरोध होता. तपोवन, कृष्णनगर, हत्तीपूल, नागचौक, काळाराम मंदिर, सरदार चौक, भाजीबाजारमार्गे रामकुंड याच मार्गावर चेंगराचेंगरी झाली होती.

आमदारांचा आक्षेप : पाहणीवेळीआमदार बाळासाहेब सानप उशिरा पोहोचले. त्यांनी साधुग्रामच्या कामांबाबात माहिती देण्यास सुरुवात केली. या वेळी महाराजांनी ‘कामाचे सोडा, निधीचे बोला’ असे म्हणताच, निधी देण्यात आल्याचे सानप यांनी सांगितले. मात्र, किती निधी आला, याची त्यांना माहिती देता आली नाही. लोकप्रतिनिधी, साधू-महंत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा हा दौरा आहे. यात इतरांनी लुडबूड करू नये, अशा शब्दांत सानप यांनी नाराजी व्यक्त केली.