आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातव्या वेतन आयोगाच्या शुभेच्छांच्या वर्षावात झाले नववर्षाचे स्वागत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- २०१६या नवीन वर्षाचे स्वागत दणक्यात झाले. नववर्षाचा पहिला दिवस असल्याने शुक्रवारी सोशल मीडियाद्वारे, तसेच प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्यात आल्या. केंद्रीय कर्मचाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या, त्या सातव्या वेतन आयोगाच्या! मात्र, हा आयोग शुक्रवारपासून (१ जानेवारी) लागू झाला की नाही याबाबत अनेक जण एकमेकांना विचारत होते, तर काही जण टीव्हीवर वृत्त आहे, याची चाचपणी करत होते.

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात तब्बल साडेतेवीस टक्के वाढ सूचवणारा अहवाल सातव्या वेतन आयोगाने केंद्र सरकारला नोव्हेंबरमध्ये सादर केला आहे. वेतन आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्यास केंद्रीय कर्मचारी निवृत्तीवेतनधारकांना त्याचा लाभ होणार आहे. या आयाेगाच्या शिफारशींची जानेवारी २०१६ पासून अंमलबजावणी केली जाणार असल्याचे वृत्त होते. त्यामुळे नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून हा आयोग लागू झाल्याच्या शुभेच्छा केंद्रीय कर्मचाऱ्यांनी दिल्या.

केंद्राने हा अहवाल स्वीकारल्यानंतर त्याचीच पुनरावृत्ती राज्य सरकारेही करतात.त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी कंेद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाबाबत विचारणा केली. मात्र, हा आयोग लागू झाला की नाही, याबाबत केंद्रीय कर्मचारीच अनभिज्ञ होते. या आयोगाबाबत काही वृत्त टीव्हीवर आहे का याची माहिती अनेक कर्मचारी घेत होते. नववर्षाचा पहिला दिवस केंद्रीय कर्मचाऱ्यांनी सातव्या वेतन आयोगाच्या शुभेच्छा देत साजरा केला. या शुभेच्छांची सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये शुक्रवारी दिवसभर चर्चा होती.

काय असतो वेतन आयोग
सरकारदर दहा वर्षांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी वेतन आयोगाची स्थापना करते. वेतन आयोग विद्यमान वेतनात दुरुस्ती करून आपला शिफारस अहवाल केंद्राला सादर करते. थोड्या फार फरकाने केंद्राकडून हा अहवाल स्वीकारला जातो त्याचीच पुनरावृत्ती राज्य सरकारेही करतात.