आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववर्षाच्या स्वगतासाठी नाशिककरांचे सहस्त्रदीप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तसेच नववर्षाचे स्वागत करताना नाशिककरांनी सहस्त्रदीप लावून विलोभनीय वातावरण निर्माण केले. या वेळी पंचम गुरुपीठाधीश श्री स्वामी सखा सुमंत सरस्वती यांनी प्रवचन दिले, तर मीना परुळकर-निकम प्रस्तुत भक्तीसंग या भावगीत भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचेही या वेळी आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, उपायुक्त अविनाश बारगळ, संदीप दिवाण, ग्रीन कुंभचे चिन्मय उदगीरकर, राजेश पंडित उपस्थित होते. गायन कार्यक्रमात मीना परुळकर-निकम यांना संगीत साथ अभिजित शर्मा, ज्ञानेश्वर कासार, अमोल पाळेकर, कन्हैया खैरनार यांनी केली. तर निवेदन श्याम पाडेकर यांनी केले. स्वामी सरस्वती यांनी उपस्थितांना गोदावरी प्रदूषण मुक्ती स्वच्छतेची शपथ दिली.