आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोहल्यावर जाण्याआधी बजावला वधू-वरांनी मतदानाचा हक्क

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मतदान केल्यानंतर सेल्फी काढताना चैतन्य व कस्तुरी कवरे. - Divya Marathi
मतदान केल्यानंतर सेल्फी काढताना चैतन्य व कस्तुरी कवरे.
नाशिक - साताजन्माच्या गाठी बांधत नवीन आयुष्याला प्रारंभ झाल्यानंतर नववधू व वराने मतदानाचा पवित्र हक्क बजावत मतदान करण्याचा सकारात्मक संदेश देत नागरिकांना मतदान करण्यासाठी खऱ्या अर्थाने लोकशाहीचा संदेश दिला. मखमलाबाद येथील शिवाजी हायस्कूल येथे विवाह समारंभ आटोपून चैतन्य कवरे आणि कस्तुरी कवरे या वधू-वरांनी मतदानाचा हक्क बजावला.
 
विवाह सोहळ्यात साताजन्माच्या गाठी बांधलेल्या वधू-वरांनी समारंभात शुभेच्छा न स्वीकारता थेट मतदान केंद्र गाठत  मतदानाचा हक्क बजावला. चैतन्य कवरे आणि कस्तुरी कवरे यांचा विवाह सोहळा सकाळी सव्वाअकरा वाजता धुमधडाक्यात साजरा झाला. विवाह समारंभानंतर होणाऱ्या विधींना काही वेळ थांबवत हे वधू-वर थेट मतदान केंद्रात दाखल झाले. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे बूथवर दोघांच्या मतदान स्लिप काढत मतदान केंद्राच्या रांगेत उभे राहिले. 

नागरिकांनी या दोघांना मतदान करण्यासाठी प्राधान्य दिले. मात्र, दोघांनी नम्रपणे नकार देत रांगेत नंबर आल्यानंतर मतदानाचा हक्क बजावला. याचबराेबर मखमलाबाद येथील भूषण शिंदे या नवरदेवाने लग्नाच्या बंधनात अडकण्यापूर्वी मतदानाचे कर्तव्य पाडण्यासाठी मखमलाबाद शाळेत येऊन मतदान केले.
 
सकाळी अाठला घरात लगीनघाई सुरू असताना नवरदेवाने  प्रभाग ६ मधील मखमलाबाद शाळेतील मतदान केंद्रात रांगेत उभे रहात मतदान केले.  गावातील नागरिकांना प्रथम त्यांना मतदानास जाण्याचा सल्ला दिला. मात्र, सामान्य नागरिकांप्रमाणे आपणही रांंगेत उभे राहूनच मतदान करणार असल्याचे सांगत नागरिकांना नकार देत रांगेत उभे राहून मतदान केले.
 
याचबराेबर माणेकशानगर येथील भाग्यश्री जगताप हिनेदेखील सकाळी ११ वाजता विवाह सोहळ्यापूर्वी सकाळ ८ वाजता काठे गल्ली परिसरातील अटलबिहारी वाजपेयी शाळेत मतदानाचा हक्क बजावला.

माणेकशानगरातील नवरीचे मुंडावळ्यांसह मतदान
माणेकशानगर परिसरातील भाग्यश्री जगताप या युवतीचे सकाळी ११ वाजता लग्न हाेते. पण, त्याअाधी सकाळी ८ वाजेच्या सुमारासच तिने अटलबिहारी वाजपेयी शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन प्रथम मतदानाचे कर्तव्य बजावले. ‘अाधी मतदान अाणि मग लग्न’ करीत मतदानाच्या हक्काचे महत्त्वच तिने अधाेरेखित केले.
बातम्या आणखी आहेत...