आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वरांचा नजराणा, हिंदी सिनेमातील मराठी माणसाचा सांगितीक गौरव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(समिरा गुजर आणि समीर दाते)
नाशिक- जगाच्या पाठीवर कुठेही जा मराठी माणसाने आपला झेंडा रोवलेला दिसतो आणि अभिमानने ऊर भरून येतो. त्यात हिंदी चित्रपटाची मुहूर्तमेढच मराठी माणसाने केली. आजही या चित्रपटांत मराठी माणूस आपली महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अशाच मराठी माणसांना संगीतातून रसिकांपुढे आणणारा कार्यक्रम म्हणजे ‘हिंदी सिनेमातला मराठी माणूस’ अरुण दाते त्यांचे पुत्र अतुल दाते लवकरच हा कार्यक्रम रसिकांच्या भेटीला घेऊन येत आहेत.
हिंदी सिनेमाची मुहूर्तमेढ नाशिकच्या चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांनी केली. म्हणजे मुळातच चित्रपटांची सुरुवातच मराठी माणसापासून झाली. तर, संगीत क्षेत्रही मराठी माणसांनी गाजवलं आहे. एवढंच नव्हे तर हिंदी चित्रपटातील अभिनेते, अभिनेत्री, गायक, गायिका, संगीतकार, दिग्दर्शक आणि अनेक तंत्रज्ञही मराठीच होत आणि आहेतही. त्यांच्याच यशस्वी कारकीर्दीला सलाम म्हणून हा कार्यक्रम स्वरपीठावर आला आहे.
वसंत देसाईंपासून ते सी. रामचंद्र, लक्ष्मीकांत प्यारेलाल, एन दत्ता, दत्ता राम, स्नेहल भाटकर, सई परांजपे, आशुतोष गाेवारीकर, मधुर भांडारकर, महेश मांजरेकर, स्वानंद किरकिरे, मंगेशकर बंधू-भगिनी, नलिनी जयवंत, उषा किरण, नूतन, तनुजा, सुमन कल्याणपूर, अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर, अमोल पालेकर, स्मिता पाटील, ऊर्मिला मातोंडकर, सचिन, माधुरी दीक्षित आणि श्रेयस तळपदेपर्यंतची गाणी या कार्यक्रमात सादर हाेणार आहेत. या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे याला दोन निवेदिका असणार आहेत. धनश्री लेले आणि समिरा गुजर. धनश्री लेले या पडद्यावर निवेदन करणार आहेत, तर समिरा या प्रत्यक्ष निवेदन करणार आहेत. त्यातही या गाण्यांच्या जन्माची गोष्ट आणि त्या गाण्यांवर काम केलेल्यांची माहिती या निवेदिका देणार असल्याचे अतुल दाते यांनी या निमित्ताने सांगितले.
आजच्या पिढीसाठी
- अनेक कलाकारांनी हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली आहे. नव्या पिढीला या कलाकारांची माहिती व्हावी हाच हेतू आहे. कार्यक्रम पोवाडा, लावणीपुरताच मर्यादित राहू नये वेगळा कार्यक्रम व्हावा, या उद्देशाने हा कार्यक्रम होणार आहे. यात आम्ही थ्री वे साऊंड वापरला असून, एलइडी स्क्रीन वापरली आहे. शिवाय ट्रॅकही ओरिजनल आहे. त्यामुळे रसिकांना नवे-जुने असा मिलाफ या कार्यक्रमात मिळेल.
अतुल दाते, निर्माते, दिग्दर्शक
बातम्या आणखी आहेत...