आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा रुपयांची नाणी नाकारण्याचा काेणत्याही बँकेला अधिकार नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सध्या बाजारात असलेली दहा रूपयांची नाणी काही बँका किंवा ग्राहक, दुकानदार यांच्याकडून नाकारण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढत अाहेत. काही बँकादेखील ही नाणी स्वीकारत नसल्याने व्यापारी ही नाणी स्वीकारण्यास तयार नाहीत यातूनच ग्राहकांची अडचण अधिक वाढत चालली अाहे. मात्र, ही नाणी भरणा करायला गेल्यावर ती स्वीकारण्यास बँका नाकारू शकत नाहीत. कारण, ही नाणी बंद केल्याचे काेणतेही परिपत्रक भारतीय रिझर्व्ह बँकेने काढलेले नाही. उलट नाेटांच्या तुलनेत नाणी अधिक टिकाऊ असतात त्यामुळे त्यांचा वापर अधिकाधिक वाढावा अशी रिझर्व्ह बँकेची अपेक्षा अाहे. 
 
नाेटबंदीच्या काळात सुट्या पैशांचा तुटवडा निर्माण झाला हाेता. यावेळी बँकांनी त्यांच्याकडील स्टाॅकमध्ये असलेली दहा रूपयांची नाणी ग्राहकांना प्रामुख्याने उपलब्ध करून दिली. या काळात ही नाणी सहज-सरळ बाजारात सगळीकडे चालत हाेती. मात्र, मागील महिन्यात खऱ्या अाणि खाेट्या दहा रूपयांच्या नाण्यांबाबतचा एका मेसेज साेशल मिडीयावर व्हायरल झाला अाणि तेव्हापासून बाजारात ही नाणी नाकारली जावू लागली अाहेत. 

काही बँकांनी फासला निर्देशांना हरताळ 
^व्यापाऱ्यांकडून ग्राहकही नाणी स्वीकारत नाहीत, कारण, काही बँकांनीही ही नाणी नाकारून रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांना हरताळ फासल्याने व्यापारी, ग्राहक नाणी स्वीकारायला तयार नाहीत. यामुळे शासनानेच जाहिरात प्रसिध्द करून याबाबत जनजागृती करावी. -प्रफुल्ल संचेती, नाशिक धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटना 

काेणतीहीबँक नाणी नाकारू शकत नाही 
^रिझर्व्ह बँकेकडून दहाची नाणी बंद झाल्याचे परिपत्रक नाही. त्यामुळे अशी नाणी नाकारण्याचा अधिकार काेणत्याही बँकेला नाही. बँकेला जर बनावट नाणी अाहेत, असा संशय असेल तर त्यांनी ही नाणी स्विकारून रिझर्व्ह बँकेकडे तपासणीसाठी पाठवावीत. ती बनावट असतील तर फाैजदारी गुन्हा दाखल होईल. नागरीकांनीही दहाची नाणी स्वीकारावीत त्यांचा चलनात वापर करणे गरजेचे अाहे. -अार. एम. पाटील, डेप्युटी जनरल मॅनेजर अॅण्ड झाेनल हेड, बँक अाॅफ महाराष्ट्र   
 
देशातील बँकांना बँकिंगसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून परवाना  मिळताे. त्यामुळे त्यांचे या बँकांवर नियंत्रण असते निर्देशांचे पालनही करावे लागते. दहाची नाणी स्वीकारू नयेत किंवा ही नाणी बंद झाली अाहेत, असे कुठलेही निर्देश रिझर्व्ह बँकेने काढलेले नाहीत. त्यामुळे बँका ही नाणी नाकारू शकत नाही. नाकारलीच तर अशा बँकेविरूध्द थेट रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करता येते. 
 
बातम्या आणखी आहेत...