आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकेकडूनच नाकारली जाताहेत चलनातील 10 रुपयांची नाणी;बँकेच्या मनमानीमुळे ग्राहकांमध्ये निर्माण झाला संभ्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातपूरच्या महिला बँकेच्या शाखेत कॅशियर समाेर ग्राहकाने अशा प्रकारे राेकड ठेवली हाेती. - Divya Marathi
सातपूरच्या महिला बँकेच्या शाखेत कॅशियर समाेर ग्राहकाने अशा प्रकारे राेकड ठेवली हाेती.
नाशिक- रिझर्व्ह बँकेने काेणत्याही प्रकारचे निर्बंध घातलेले नसतानाही सातपूरमधील नाशिक जिल्हा महिला सहकारी बँकेने मनमानी करत बँकेत येणाऱ्या ग्राहकांकडून दहा रुपयांचे चलनी नाणे स्वीकारण्यास नकार दिला जात अाहे. भारतीय चलनाला चक्क बँकेकडूनच नाकारले जात असल्याने ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था असून, दहा रुपयांच्या नाण्याची देवाण-घेवाण करण्यावरून बाजारपेठेतही ग्राहक व्यावसायिकांमध्ये वाद निर्माण हाेतात. 
 
सातपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडईत नाशिक जिल्हा महिला सहकारी बँकेची शाखा अाहे. बाजारपेठेतच शाखा असल्याने मंडईतील व्यावसायिकांसह भाजीविक्रेत्यांची या शाखेत खाती अाहेत. त्यामुळे बँकेत दरराेज विक्रेत्यांचे अार्थिक उलाढालीचे व्यवसाय हाेत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बँकेने दहा रुपयांचे नाणे स्वीकारणे बंद केले अाहे. बँक नाणे घेत नसल्यामुळे बाजारपेठेत भाजी खरेदी करण्यासाठी अालेल्या ग्राहकांकडून भाजी विक्रेतेही नाणे स्वीकारत नाहीत. त्यामुळे काेणत्याही प्रकारची बंदी नसताना नाणे का घेतले जात नाही? या कारणाहून ग्राहक विक्रेत्यांमध्ये नेहमीच वाद हाेत अाहे. बुधवारी (दि. ३) राेजी बँकेत प्रभाकर केरूजी गाेरे हे ज्येष्ठ खातेदार पैशाचा भरणा करण्यास गेले असता त्यांच्याकडील २६० रुपये मुल्याचे दहा रुपयांचे नाणे स्वीकारण्यास नकार दिला. ग्राहकाने वारंवार विनंती करूनही नाणे घेतले जात नव्हते. दरम्यान, याचवेळी बँकेत कामानिमित्त गेलेल्या प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींच्या लक्षात ही बाब अाली. त्यांनी बँकेच्या व्यवस्थापिका माधुरी देशपांडे यांच्याकडे नाणे स्वीकारण्याबाबत चाैकशी केली असता त्यांनी अटींच्या अाधारे त्या रकमेचा स्वीकार करण्यास सांगितले. 
 
काेणत्याही सूचना केलेल्या नाहीत 
-महिला बँकेच्या सर्वच शाखांमध्ये दहा रुपयांच्या नाण्याचा स्वीकार केला जाताे. नाणे नाकारण्याबाबत अाम्ही काेणत्याही प्रकारच्या सूचना केलेल्या नाहीत. सातपूरच्या शाखेत असे घडले असेल ती मी चाैकशी करेल. -शशीताई अाहिरे, अध्यक्ष, महिला बँक 
 
नाणे नाकारणे हा माेठा गुन्हा 
-रिझर्व्हबँकेने एक ते २० रुपयांपर्यंत काढलेली नाणे म्हणजेच १० रुपयांची नाेट अाहे. मात्र, नाणी यंत्रावर माेजता येत नसल्याने बँकेने सोयीस्कर भूमिका घेतली असेल, मात्र नाणे नाकारणे हा माेठा गुन्हा अाहे. अरूण कुकडे, बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ 
 
नाेटा खराब हाेण्याचा धाेका अधिक 
नाणी तयार करण्यासाठी लागणाऱ्या धातूची किंमत आणि त्याच्या घडणावळीचा खर्च कधी कधी नाण्याच्या मूल्यापेक्षा अधिक असताे. त्यामुळे ही नाणी पाडणेही अवघड झाले आहे. त्यातच नाण्याच्या चलनी किमतीपेक्षा त्याच्या धातूचा भाव अधिक झाला की काही लोक नाणी वितळवण्याचा उद्योग करून अधिक पैसा कमवतात. नुकतीच पाच रुपयांच्या नाण्यांपासून धातूचे ब्रेसलेटही बनवण्याचा प्रकार उघडकीस अाला हाेता. पाच दहा रुपयांची चलनी नोटांत उपलब्ध असली तरी अतिवापरामुळे या नोटा लवकर खराब होतात. त्यामुळे त्यांची नाणी चलनात आणणे योग्य अाहे. 
बातम्या आणखी आहेत...