आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

११ वीच्या पहिल्या फेरीत, १० हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या केंद्रीय प्रवेशप्रक्रियेतील पहिल्या गुणवत्ता यादीचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत १० हजार ६७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. यामध्ये सुमारे हजार ३०० विद्यार्थ्यांचे काेटा प्रवेश तर हजार विद्यार्थी गुणवत्तेनुसार प्रविष्ट झाले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रवेशासाठी भाग भाग चे अर्ज भरलेले नाहीत, त्यांच्यासाठी १५ आणि १७ जुलै रोजी बीवायके महाविद्यालय, बिटको महाविद्यालय आणि पंचवटी महाविद्यालय येथे उपलब्ध प्रवेश माहितीपुस्तिका घेऊन अर्ज भरायचे आहेत. 
 
यानंतर ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या तिसऱ्या पसंती क्रमांकाचे महाविद्यालय मिळूनही त्यांनी प्रवेश निश्चित केलेला नाही अशा विद्यार्थ्यांनी १५ १६ जुलै रोजी पसंतीक्रम शाखा बदलून अर्ज भरायचे आहेत. जे विद्यार्थी पसंतीक्रम बदलणार नाहीत त्यांचे मागील फेरीतील पसंतीक्रम या फेरीसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यांनी नव्याने अर्ज भरण्याची गरज नाही. तसेच या फेरीसाठी नव्याने लॉगीन आयडी घेण्याची आवश्यकता नाही, माहितीपुस्तक घेतलेले आहे त्यांनी त्याचद्वारे फॉर्म भरावे. दुसरी गुणवत्ता यादी २० जुलै रोजी सायंकाळी वाजता संकेतस्थळावर उपलब्ध हाेईल. यातील विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया २१ ते २४ जुलैदरम्यान हाेईल. ज्यांना पहिल्या फेरीत प्रथम प्राधान्य क्रमांकाचे काॅलेज मिळाले असे या फेरीसाठी अपात्र ठरतील. मात्र, त्यांच्यासाठी अन्य शैक्षणिक पर्याय उपलब्ध असणार असल्याने त्यांनी यात प्रवेश निश्चित केलेे नाहीत. 
 
 
बातम्या आणखी आहेत...