आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरावीचा दुसरा कटअाॅफ; विज्ञान ९२, तर वाणिज्य ८७

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अकरावी प्रवेशासाठीच्या पहिल्या गुणवत्ता यादीने यंदा उच्चांक गाठल्यानंतर दुसऱ्या यादीतही विज्ञान शाखेचा कट अाॅफ केवळ दोन टक्क्यांनी, तर वाणिज्यचा कट ऑफ तीन टक्क्यांनी कमी झाला. दुसऱ्या यादीचे कट अाॅफ अनुक्रमे ९२.८ ८७ टक्के राहिले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २१ ते २४ जुलै या कालावधीत संबंधित महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणे आवश्यक आहे. 
 
nashik.11thadmission.net या संकेतस्थळावर दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली. पहिल्या गुणवत्ता यादीनंतर १५ हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ ५० टक्के, म्हणजे सात हजार ७७४ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. उर्वरित सात हजार १५७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नव्हता. पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाल्याने बहुतांश विद्यार्थ्यांनी प्रवेश घेता दुसऱ्या गुणवत्ता यादीची प्रतीक्षा केली. नाशिक शहर देवळाली कटक मंडळातील ५७ कनिष्ठ महाविद्यालयांतील २४ हजार ७२० जागांसाठी २६ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज अाले आहेत. सर्वाधिक अर्ज विज्ञान शाखेसाठी असून त्यानंतर वाणिज्य शाखेसाठी अर्ज आले आहेत. कला शाखेसाठी यंदाही कमी अर्ज प्राप्त झाले आहेत.
 
प्रथम पसंतीच्या कॉलेजात प्रवेश घेणे अनिवार्य 
अकरावीप्रवेशासाठी गुणवत्ता यादीत प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळाल्यास त्यात प्रवेश घेणे अनिवार्य राहणार आहे. विहित मुदतीत प्रवेश घेतल्यास प्रवेश प्रक्रियेपासून वंचित व्हावे लागेल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे पहिल्या यादीत प्रथम पसंतीक्रम मिळवूनही प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर तांबे यांनी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
बातम्या आणखी आहेत...