आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरावीची उद्या चौथी गुणवत्ता यादी होणार जाहीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अकरावीच्या पहिल्या, दुसऱ्या तिसऱ्या गुणवत्ता यादीत आतापर्यंत १५ हजार ११८ विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यातील १२ हजार ३११ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. तर दोन हजार ४८७ विद्यार्थ्यांची निवड होऊनही या विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत. त्यामुळे ऑगस्ट रोजी जाहीर होणाऱ्या चौथ्या गुणवत्ता यादीकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत निवड झालेली नाही. 
 
अकरावी ऑनलाइन प्रवेशात भाग एक दोन अंतर्गत ज् यांनी प्रवेश अर्जाची नोंदणी केेली नाही, अशांना अर्ज करण्याची संधी शिक्षण विभागाने दिली अाहे. विद्यार्थ्यांनी अॉगस्ट रोजी शहरातील महाविद्यालयांतून प्रवेश अर्जाची नोंदणी केली. शहरातील ५७ कनिष्ठ कॉलेजांत अॉनलाइन प्रवेशप्रक्रिया होत असून, त्यासाठी २४ हजार ७२० जागांसाठी २६ हजार अर्ज अाले. पहिल्या यादीनंतर सात हजार ७७४ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. दुसरी गुणवत्ता यादीत सहा हजार ७३७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यात ३०२२ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहे. तिसऱ्या यादीनंतर १२ हजार ३११ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहे. गुणवत्ता यादीत प्रथम पसंतीचे कॉलेज मिळाल्यास त्यात प्रवेश घेणे अनिवार्य आहे. मुदतीत प्रवेश घेतल्यास प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहावे लागेल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. तिसऱ्या फेरीनंतर महाविद्यालय निहाय रिक्त जागांचा तपशील nashik.11thadmission.net या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

१५ हजार प्रवेश पूर्ण, रविवारी चौथी यादी 
अकरावीच्या पहिल्या, दुसऱ्या तिसऱ्या यादीत १५ हजार ११८ विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यातील १२ हजार ३११ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. तर दोन हजार ७७० विद्यार्थ्यांचे प्रवेश वेगवेगळ्या कोट्या अंतर्गत झाले आहेत. अकरावीची रविवारी चौथी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...