आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरावी प्रवेशप्रक्रियेसाठी २६ जुलैला अखेरची संधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना या प्रक्रियेत सहभागी होण्याची अखेरची संधी उपलब्ध झाली असून, ऑनलाइन प्रवेश अर्जाचा भाग एक दोन भरलेल्या विद्यार्थ्यांना २६ जुलै रोजी प्रवेश अर्जाचे दोन्ही भाग भरता येतील. त्यासाठी शिक्षण विभागातर्फे शहरातील तीन महाविद्यालयांतील केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवेश अर्ज करू शकलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या प्रवेशाचा मार्गही सुकर होणार आहे. 
 
नाशिक शहर देवळाली कटक मंडळातील (कॅन्टाेन्मेंट बाेर्ड) ५७ कनिष्ठ महाविद्यालयांत यंदा प्रथमच अॉनलाइन प्रवेशप्रक्रिया होत असून, त्यासाठी २४ हजार ७२० जागांसाठी २६ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज अाले आहेत. सर्वाधिक अर्ज विज्ञान शाखेसाठी, तर त्यापाठाेपाठ वाणिज्य शाखेसाठी अर्ज आले आहेत. पहिल्या गुणवत्ता यादीतील १४ हजार ९६५ विद्यार्थ्यांपैकी ५० टक्के म्हणजे हजार ७७४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. तर शिक्षण विभागातर्फे गुरुवारी (दि. २०) दुसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. या यादीत सहा हजार ७३७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २१ ते २४ जुलैपर्यंत संबंधितमहाविद्यालयात प्रवेश घेणे आवश्यक आहे. 

nashik.11thadmission.net या संकेतस्थळावर दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली अाहे. अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी अद्याप प्रवेश अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना २६ जुलै रोजी प्रवेश अर्ज करता येणार आहे. तिसऱ्या यादीसाठी पात्र विद्यार्थी २६ जुलैपर्यंत पसंतीक्रम शाखा बदल करू शकतील. पसंतीक्रम बदलणाऱ्या विद्यार्थ्यांचे मागील फेरीसाठीचेच पसंतीक्रम तिसऱ्या फेरीसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यांनी नव्याने अर्ज भरण्याची गरज नाही, असे शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे कळवण्यात आले आहे. 

 
बातम्या आणखी आहेत...