आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरावी प्रवेशासाठी प्रतीक्षाच... नक्की प्रवेशप्रक्रिया किती वेळात पूर्ण होणार याबाबतही संभ्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- दहावीच्या निकालानंतर अकरावीची केंद्रीय प्रवेशप्रक्रिया सुरू झाली. साेमवारी (दि. १०) या प्रवेशप्रक्रियेमध्ये पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार होती. सायंकाळी वाजता जाहीर होणाऱ्या यादीची प्रतीक्षा रात्री वाजेपर्यंत होती. मात्र, शिक्षण विभागाकडून याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले गेले. तर महाविद्यालयांत संपर्क केला असता, उद्यापर्यंत यादी जाहीर झाल्यास प्रवेश सुरू करू, असे उत्तर दिले गेले. 

केंद्रिय प्रवेशप्रक्रियेमध्ये सुरळीत प्रवेशप्रक्रियेच्या अपेक्षेने पालक आणि विद्यार्थी वेळापत्रकावर विश्वास ठेवून होते. पण, रात्री उशिरापर्यंत याबद्दल कोणतीही सूचना मिळाली नाही. गुणवत्ता यादी लागल्यानंतर याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे कळवली जाणार आहे. त्यामुळे नक्की प्रवेशप्रक्रिया किती वेळात पूर्ण होणार याबाबतही संभ्रम तयार झाला आहे. याबाबत सातत्याने पाठपुरावा केला असता, पुण्यातून अजून कोणतीही सूचना आलेली नाही, असे उत्तर उशिरापर्यंत मिळत होते. यामुळे विद्यार्थी आणि पालक ताटकळत बसल्याचे चित्र दिसत होते. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेशप्रक्रियेबाबतच्या बदलणाऱ्या वेळा आणि नव्या घडामोडीसाठी अधिकृत संकेतस्थळांची मदत घ्यावी, असे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर एसएमएसवरून प्रवेशासाठीच्या गुणवत्ता यादीची माहिती मिळणार असल्याने यादीची उत्सुकता कायम होती. 
बातम्या आणखी आहेत...