आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाॅम्बस्फाेटातील संशयितांचे लष्करशी कनेक्शन उघड ?, एटीएस माजी प्रमुखांचा खुलासा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मालेगावमध्ये सप्टेंबर २००६ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील नऊ संशयितांची पाच वर्षांपूर्वी जामिनावर मुक्तता झाली असतानाच यातील दाेघांनी पाकिस्तानात जाऊन लष्कर-ए-ताेयबाकडून प्रशिक्षण घेतल्याचे कनेक्शन पुन्हा एकदा खासगी वृत्तवाहिनीवर एटीएसच्या माजी प्रमुखाच्या विधानामुळे चर्चेत अाले अाहे.

सप्टेंबर २००६ मध्ये मालेगाव येथे बडा कब्रस्तानसह भागातील हमीदिया मशिदीजवळ हा बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता. यापाठाेपाठ वेगवेगळ्या तीन ठिकाणी झालेल्या साखळी स्फाेटात ३७ जण ठार, तर १०० हून अधिक जखमी झाले होते. याप्रकरणी दहशतवादविराेधी पथकाने (एटीएस) शहरातूनच नऊ जणांना अटक केली हाेती. यातील संशयित हे ‘सिमी' या प्रतिबंधित संघटनेचे सदस्य असून त्यांनीच मालेगाव स्फोट घडवल्याचे दाेषाराेपपत्रही एटीएसने न्यायालयात दाखल केले हाेते. या तपासात पथकाने संशयितांमधील दाेघांचे पाकिस्तानातील अतिरेकी संघटनेशी संबंध असल्याचेही पुरावे सादर केले हाेते. दरम्यान, मालेगाव येथे झालेला बॉम्बस्फोट मुस्लिम नव्हे, तर हिंदू संघटनेने घडवल्याचा खळबळजनक कबुलीजबाब ‘समझौता एक्स्प्रेस' स्फोटातील संशयित स्वामी असीमानंद यांनी दिला हाेता. याचाच अाधार घेत तब्बल चार वर्षांपासून अटकेत असलेल्या नऊही संशयितांनी विशेष माेक्का न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला हाेता. दरम्यान, एटीएसच्या माजी प्रमुखांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा याप्रकरणात राजकारण तापण्याची शक्यता आहे.
एनआयएचाही विरोध
या जामिनास राष्ट्रीय दहशतवादविराेधी पथकानेही (एनअायए) विराेध न दर्शवल्याने सात संशयितांना नाेव्हेंबर २०११ मध्ये जामीन मंजूर केला हाेता. यातील दाेघांविराेधात मुंबईच्या साखळी स्फाेटातील अाराेपींशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करत त्यांचा जामीन नामंजूर करण्यात अाला हाेता. दरम्यान, एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात एटीएसच्या माजी प्रमुखांनी बाेलताना मालेगाव बाॅम्बस्फाेटातील दाेघा संशयितांचे लष्कर-ए-ताेयबाशी कनेक्शन असल्याचा दावा केल्याने पुन्हा या विषयाची चर्चा सुरू झाली अाहे.