आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात 500-1000 रुपयांच्या 1 कोटींच्या जुन्या नोटा हस्तगत, 5 संशयीतांना घेतले ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- चलनातून रद्द करण्यात आलेल्या एक कोटी रूपयांच्या पाचशे व हजारांच्या जुन्या नोटा पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेली माहिती अशी की, व्दारका परिसरात पोलिसांनी झायलो गाडीचा पाठलाग करुन ही कारवाई केली. गाडीतून पोलिसांनी चलनातून रद्द झालेल्या 99 लाख 95 हजारांच्या पाचशे व हजारांच्या नोटा जप्त‍ केल्या आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयीतांमध्ये सागर कुलथे या सराफाचाही समावेश आहे. 
 
कृष्णा हनुमंत होळकर ( 50, रा. गंगापुरगाव, ता. राहुरी जि. अहमदनगर ), सागर सुभाश कुलथे (34, रा. द्वारका, नाशिक ), शिवाजी दिगंबर मैद ( 45, रा. संगमनेर,अहमदनगर ), योगेश रवींद्र नागरे. ( 35, रा. द्वारका, नाशिक ) , मिलिंद नारायन कुलथे ( 40, रा. रा. संगमनेर, अहमदनगर )  अशी आरोपींची नावे आहेत. 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...