आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जुन्या नाेटांचा विशिष्ट वापर; अाज मध्यरात्रीपर्यंतच मुदत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - चलनातून रद्द झालेल्या नाेटा शासकीय रुग्णालये, रेल्वे, बस, महावितरण, बीएसएनएल, महापालिका यासह अाैषध दुकाने अाणि पेट्राेलपंपावर स्वीकारण्यासाठी केंद्र सरकारने दिलेली मुदत गुरुवारी (दि. २४) मध्यरात्री असून, या निर्णयाला मुदतवाढ मिळते की अाता या नाेटा थेट बँक खात्यातच जमा कराव्या लागतात, याकडे लक्ष लागून अाहे. यासंदर्भात गुुरुवारी सायंकाळपर्यत सुधारित निर्णय हाेण्याची शक्यताही व्यक्त केली जात अाहे.
दरम्यान, बुधवारी बहुतांश बँकांतील स्थिती बऱ्यापैकी सामान्य झालेली हाेती. मात्र, दाेन-चार बँकांचे काही एटीएम वगळता इतरांची शटर्स मात्र बंदच हाेती. पाेस्टासमाेर लांब रांगा हाेत्या. दिल्लीत हाेणाऱ्या निर्णयांचे ठाेस मार्गदर्शन बँकांपर्यंत वेळेत पाेहाेचत नसल्याने अनेक गरजूंना अाल्या पावली परतावे लागते अाहे. यात लग्न समारंभासाठी अडीच लाख रुपये िमळण्यात अडचणी येत असल्याचे काही वधूपित्यांनी सांगितले.

काही बँकांच्या शाखांत क्रेडिट कार्डवर रक्कम भरताना अाता क्रेडिट कार्डच्या बिलाची झेराॅक्सही मागितली जात असून एका उद्याेजकाकडे तर नव्या नाेटांचा भरणा करण्यासाठीही घाेषणापत्र भरून देण्याची मागणी एका नामांकित खासगी बंॅकेने केल्याने हा विषय उद्याेजकांत चर्चेचा ठरला.
शंभराच्या नाेटांसह देना बँक रुग्णांच्या मदतीस

एकाबाजूला बँकांत गर्दी अन् दुसरीकडे अनेक एटीएममधून केवळ दाेन हजार रुपयांच्याच नाेटा िमळत असल्याने नागरिक हैराण झाल्याच्या पार्श्वभूमीवर व्यवहारासाठी अावश्यक शंभर रुपयांच्या नाेटा थेट दारात जाऊन देण्याचा अनाेखा उपक्रम देना बँकेने बुधवारी (दि. २३) राबविला. अत्यंत अडचणीच्या काळात जिल्हा रुग्णालयात दिलेल्या या सुविधेमुळे रुग्णांचे नातेवाइक, डाॅक्टर कर्मचाऱ्यांना सुखद धक्का बसला.

देना बँकेतर्फे सकाळीच रुग्णालयासमाेर ‘नगद भुगतान केंद्र’ सुरू करण्यात अाले. येथून डेबिट िकंवा क्रेडिट कार्ड स्वाइप करून काेणाही नागरिकाला शंभर रुपयांच्या दहा नाेटा याप्रमाणे एक हजार रुपये तत्काळ देण्यात येत हाेते. सायंकाळपर्यंत बँकेने या सुविधेतून सुमारे सव्वाशे नागरिकांना पैसे उपलब्ध करून िदले. त्याचा फायदा रुग्णांच्या नातेवाइकांसह डाॅक्टर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीही घेतला.

अाजपासूनमाेबाइल एटीएम व्हॅन : देनाबँक गुरुवारपासून (दि. २४) शहरात माेबाइल एटीएम सुरू करणार अाहे. वाहनावरील हे एटीएम शहरात फिरणार असून जागाेजागी थांबेल. त्यातून ग्राहकांना सर्वसाधारण एटीएमप्रमाणेच सेवा िमळणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...