आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

58 हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण; पण उपद्रव कायम, कुत्र्यांच्या प्रजननावर झालेल्या परिणामाचा अहवाल पालिकेकडे नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सिडकाेत पिसाळलेल्या कुत्र्याने २० जणांना जखमी केल्यानंतर त्यांच्या उपद्रवाचा विषय पुन्हा चर्चेत अाला अाहे. संपूर्ण शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास कमी हाेण्याची चिन्हे नसताना महापालिका मात्र श्वान निर्बीजीकरणाच्या उपयुक्ततेवर ठाम असल्याचे चित्र अाहे. महापालिकेच्या अाराेग्य विभागाने गेल्या अाठ वर्षांत तब्बल ५८ हजार १३१ भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले असून निर्बीजीकरण उपद्रवाचा थेट संबंध नसल्याचे दावे केले जात अाहेत. 
श्वान अचानक हिंस्त्र हाेण्यामागे नेमके काय कारण याबाबत खल सुरू झाला असतानाच महापालिकेने मात्र श्वानांवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे निर्बीजीकरणाचे काम चाेख सुरू असल्याचा दावा केला अाहे. २००९ पासून महापालिका क्षेत्रात खासगी ठेकेदारामार्फत कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम सुरू अाहे. भटक्या कुत्र्यांना दाेन फिरत्या वाहनांच्या साहाय्याने पकडून पाथर्डी शिवारातील निर्बीजीकरण केंद्रात शस्त्रक्रिया केली जाते. त्यानंतर रोग प्रतिबंधक लस देऊन जेथून पकडले, त्याच ठिकाणी पुन्हा साेडले जाते. खूण म्हणून कुत्र्याच्या डाव्या बाजूच्या कानाचा भाग त्रिकोणाकार पद्धतीने कापला जाताे; मात्र गेल्या काही वर्षांत खराेखरच किती कुत्र्यांचे निर्बीजीकरण झाले वा निर्बीजीकरणानंतर त्यांच्या प्रजननावर किती परिणाम झाला, याचा काेणताही अहवाल महापालिकेकडे नाही. 
 
तक्रारींची संख्या घटली 
- भटक्या कुत्र्यांसंदर्भातपूर्वी सहाही विभागातून प्रत्येकी अाठ-दहा तक्रारी येत होत्या. आता मात्र सहाही विभागातून प्रत्येकी जेमतेम एक-दोन तक्रारी प्राप्त होतात. त्यामुळे भटक्या कुत्र्यांपासून होणाऱ्या त्रासाच्या घटना कमी झाल्या आहेत. उत्तमनगर भागातील कुत्रा पिसाळलेला असण्याची शक्यता आहे. त्यास पकडण्यात आले असून निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. -डॉ. सोनवणे, पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका 
बातम्या आणखी आहेत...