आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीनशे रुपयांत जीवघेण्या अॅसिडचा धंदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अॅसिड हल्ल्याचे वाढते प्रकार लक्षात घेता रासायनिक द्रव्याच्या दुकानातून कोणत्याही स्वरूपाचे अॅसिड खरेदी करण्यासाठी त्या ग्राहकांचे ओळखपत्र तपासणे त्याबाबतची नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे असतानाही शहरातील काही केमिकल पेंटिंगचे साहित्य विक्री करणाऱ्या दुकानदारांकडून कोणत्याही चौकशीविना केवळ अर्थकारण डोळ्यांसमोर ठेवून शरीरास घातक अशा अॅसिडची बिनबोभाट विक्री सुरू असल्याची धक्कादायक बाब डी. बी. स्टारच्या पाहणीत उघड झाली आहे. तीनशे रूपये माेजत काेणत्याही नाेंदीशिवाय डी. बी. स्टार प्रतिनिधीने काही दुकानांमधून अॅसिडही खरेदी केली. या रासायनिक द्रव्यांचा दुरुपयाेग करून अॅसिड हल्ला हाेण्याची शक्यता असतानाही त्यावर एकाही शासकीय संस्थेचे नियंत्रण नसल्याचे धक्कादायक चित्र अाहे. या प्रश्नावर "डी. बी. स्टार'ने टाकलेला हा प्रकाशझाेत... 
 
प्रेमासअथवा लग्नास नकार देणे, एकतर्फी प्रेमातून वा अार्थिक वाद, हुंड्याची मागणी अशा प्रकरणातून हाेणाऱ्या वादात बदला घेण्यासाठी अॅसिड हल्ल्याची प्रकरणे सातत्याने पुढे येत आहेत. गेल्या काही वर्षांत या घटनांत वाढ झाली आहे. असे असतानाही घातक अॅसिड आजही बाजारपेठेत सहजरित्या उपलब्ध होणे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. 
 
अॅसिड हल्ल्यामुळे डोळे, चेहरा जळून विद्रुप होऊन पीडित व्यक्तीचे संपूर्ण जीवनच उद‌्ध्वस्त होते. देशभरात विशेषत: प्रमुख राज्यांच्या राजधानीत अॅसिड हल्ल्याचे गेल्या काही वर्षात वाढलेले प्रमाण लक्षात घेता अॅसिडच्या विक्रीबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र शासनाला फटकारले होते. याची दखल घेत केंद्र शासनाने दुकानदारांना अॅसिड खरेदी-विक्री करताना ग्राहकांचे ओळखपत्र तपासणे, त्याबाबतची नोंद करणे बंधनकारक करण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्रक सर्वोच्च न्यायालयात दाखल केले होते. अतिशय संवेदनशील गंभीर बनलेल्या अॅसिड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील रसायने विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये डी. बी. स्टार प्रतिनिधींनी अॅसिड विक्रीबाबत आढावा घेतला. दरम्यान, कोणत्याही चौकशीविना सल्फ्युरिक अॅसिड देण्यात आले. विशेष म्हणजे देण्यात आलेले हे अॅसिड मानवी शरीरासाठी अत्यंत धोकेदायक असल्याने याचा वापर करताना स्वतःची सुरक्षितता जपा, तसेच हात चेहरा सांभाळा असा मोलाचा सल्लाही दुकानदारांकडून देण्यात आला. याबाबत बिलांची मागणी केली असता या वस्तूंचे कोठे बिले मिळते का?, असा प्रश्नही डी. बी. स्टार प्रतिनिधीला विचारण्यात आला. सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण बाब असलेले अशाप्रकारचे अॅसिड शहरातील मध्यवर्ती भागात सर्रासपणे विकले जात असल्याने नागरिक, विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. 

पाच वर्षांत ८०२ अॅसिड हल्ले 
एएसएफआय संस्थेच्या अहवालानुसार २०११ ते २०१५ या कालावधीत देशभरात विविध ठिकाणी झालेल्या अॅसिड हल्ल्यांबाबतचा आढावा घेतला तर, या पाच वर्षांच्या काळात तब्बल ८०२ अॅसिड हल्ल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यात एकट्या महाराष्ट्राचा विचार केल्यास या कालावधीत ३१ हल्ले झाल्याची नोंद आहे. गेल्या काही वर्षात मुली अथवा महिलांवर अॅसिड हल्ला करण्याची धमकी देऊन लैंगिक अत्याचार करण्यात आल्याच्या गुन्ह्यांची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. यावरुन ही बाब किती गंभीर आहे, हे लक्षात येते. 

कृ़षी क्षेत्राशी निगडित खते, बियाणे वा अन्य रासायनिक द्रव्यांची विक्री करताना संबंधित दुकानदारांने केवळ खते-बियाणे आदेश, कीटकनाशक आदेशातील तरतुदींमध्ये समाविष्ठ असलेल्या वस्तूंची विक्री करणे बंधनकारक आहे. या तरतुदींचे उल्लंघन केले असता, संबंधित दुकानदारांचा परवानादेखील रद्द करण्याची तरतूद नियमांत आहे. असे असतानादेखील शहरातील दिंडोरीरोड, मालेगाव स्टँड परिसरातील खते विक्री करणाऱ्या दुकानातून अशा प्रकारच्या धोकेदायक रासायनिक द्रव्याची विक्री होत असल्याने कृषी विभागाने ही बाब गांभीर्याने घेत केवळ पैसा मिळविण्याच्या हेतूने घातक अॅसिड विक्री करणाऱ्या दुकानदारांविरुद्ध तातडीने कारवाई करणे अपेक्षित आहे. कारवाई होऊनही पुन्हा अॅसिड विक्री आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. तसेच, संबंधित दुकानाचा परवाना कायमचा रद्द केल्यास हे प्रकार थांबतील. 

शहरातील केमिकल वा पेंटीगच्या दुकानांमध्ये अॅसिडची होणारी खरेदी वा व्रिकी याबाबत दुकानावर नियंत्रण वा बंधन घालण्याचे काम कोणत्या विभागाचे आहे हाच मुख्य प्रश्न या प्रकारामुळे उपस्थित होत आहे. शहरातील काही दुकानामध्ये अशा प्रकारचे अॅसिड वा मानवी शरीरास घातक रासायनिक द्रव्ये विकली जात असल्याबाबत अन्न औषध प्रतिबंध विभागाकडे विचारणा केली असता अॅसिड व्रिकी हे आमच्या अखत्यारीत येते का याचा शोध घ्यावा लागेल असे उत्तरे देण्यात आले. तसेच प्रकारापासून विभागाचा संबध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. शहरात सुरू असलेल्या या प्रकाराबाबत जबाबदार असलेल्या विभागाकडून मात्र एकमेकांकडे बोट दाखविण्याचे प्रकार सुरू असल्याची प्रचिती अनुभवयास मिळाली 
हेमंत काळे 
 
"एफडीए'ची टाेलवाटाेलवी 
{ शहरातील कृषी उत्पादन विक्रेत्यांकडून सर्रासपणे अॅसिडची विक्री केली जाते. याबाबत काय? 
}कृषी उत्पादन विक्रेत्यांनी नियमातील तरतुदीप्रमाणे मान्यता असलेल्या उत्पादनांचीच विक्री करावी. नियमात नसलेल्या उत्पादनाची विक्री केली जात असल्यास संबंधित दुकानदारावर कारवाई होवून परवाना रद्द करण्यात येईल. 
{ कृषीउत्पादन विक्रेत्यांची नियमित तपासणी केली जाते का? 
}जिल्ह्यातील, तसेच शहरातील कृषी उत्पादन, रसायने विक्री करणाऱ्या दुकानांची नियमित तपासणी केली जाते. दुकानदारांनी कोणते उत्पादन विकले याबाबतची नोंददेखील केली जाते.
{ तपासणीमध्येकृषी उत्पादन विक्रेते दोषी आढळले का? असतील तर त्यांच्याविरुद्ध काय कारवाई केली? 
}गेल्या वेळी झालेल्या तपासणीत दिंडोरीरोड भागातील काही विक्रेते दोषी आढळते होते. त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात आली. 
 
बातम्या आणखी आहेत...